*साकव्य पाक्षिक कवी कट्टा निकाल🎤*
*”ज्येष्ठ कवयित्री अरुणा मुल्हेरकर ठरल्या साकव्य-श्रेष्ठ कवयित्री!”*
महाराष्ट्रातील एकमेव आगळावेगळा कवी कट्टा अर्थातच् ‘साकव्य पाक्षिक कवी कट्टा’ पर्व-२ चा निकाल दिनांक २६ नोव्हेंबर, शनिवारी महाराष्ट्रातील ज्येष्ठ तसेच श्रेष्ठ कवी-कवयित्री..
डॉ. राजेश गायकवाड, श्री. विजय जोशी, सौ. संजीवनी तोफखाने, सौ.अंजली मराठे, डॉ. स्वाती घाटे, श्री. प्रदीप तळेकर आणि श्री. अनिल देशपांडे यांच्या काटेकोर परीक्षणानुसार जाहीर केला गेला. उपांत्य आणि अंतिम फेरीतील सर्वच प्रतिभावंत कवी, कवयित्री यांनी १o, १२ आणि १४ नोव्हेंबरला हा कवी कट्टा बहारदार पणे रंगवला आणि या अटीतटीच्या काव्य मैफिलीत विजेते ठरले..
उत्तेजनार्थ द्वितीय – कवी शंकर माने
उत्तेजनार्थ प्रथम – कवयित्री राखी जोशी
तृतीय स्थान – कवयित्री रेखा कुलकर्णी
द्वितीय स्थान – कवयित्री जयश्री कुलकर्णी
प्रथम स्थान – कवयित्री अरुणा मुल्हेरकर
•
या व्यतिरिक्त रेडिओ विश्वास चे डॉ. हरीभाऊ कुलकर्णी यांनी विजेत्यांची मुलाखत त्यांच्या ९o.८ एफ.एम. बॅन्डवर घेण्याची घोषणा करुन विजेत्यांच्या आनंदात भर टाकली.
•
या मनोरंजक सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे यात कवी कट्ट्याचे तंत्रतज्ञ, समन्वयक आणि परीक्षकांनी आपापल्या मनोरंजक रचना सादर केल्या.
•
समारोपाच्या भाषणात साकव्य कुटुंब प्रमुख श्री. पांडुरंग कुलकर्णी यांनी साकव्य पाक्षिक कवी कट्टा पर्व-३ च्या नव्या स्वरूपाची घोषणा करत सौ. राखी जोशी या पर्वाच्या समन्वयक असतील हे ही सांगितले.
लवकरच साकव्य पाक्षिक कवी कट्टा पर्व-३, भाग-१ सादर होणार आहे व त्यासाठी उत्सुकतेने नांव नोंदणीला ही सुरुवात झालेली आहे.