You are currently viewing वेंगुर्ले तालुक्यातील छाननी प्रक्रिया संपन्न..  

वेंगुर्ले तालुक्यातील छाननी प्रक्रिया संपन्न..  

सरपंच पदासाठी १०४, तर सदस्य पदासाठी ४८१ उमेदवार रिंगणात

ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदाचे ३ उमेदवारी अर्ज अवैध

 

वेंगुर्ला :

वेंगुर्ल्यात आज ग्रामपंचायत निवडणूकीची छाननी प्रक्रिया तहसील कार्यालयात पार पडली. २३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी दाखल झालेल्या १०४ उमेदवारी अर्जांपैकी सर्व अर्ज वैध ठरले आहेत. मात्र सदस्य पदासाठी दाखल झालेल्या ४८४ अर्जांपैकी २ ग्रामपंचायतचे ३ सदस्य अर्ज अवैध ठरले आहेत, त्यामुळे ४८१ अर्ज वैध ठरले आहेत अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

वेंगुर्ले तालुक्यामध्ये भोगवे ग्रामपंचायत येथे दाखल झालेल्या २२ सदस्य अर्जापैकी २ सदस्यांचे अर्ज आणि मेढा ग्रामपंचायत सदस्यसाठी दाखल झालेल्या ११ पैकी १ सदस्य अर्ज अवैध ठरला आहे. दरम्यान एकूण २३ ग्रामपंचायतसाठी सरपंच पदासाठी असलेल्या १०४ वैध अर्जांपैकी आणि सदस्य पदाच्या वैध ठरलेल्या ४८१ सदस्यांपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी किती उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेतात त्यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा