अर्ज छाननी प्रक्रियेनंतर चित्र स्पष्ट; ९१७ पैकी ३ सदस्य अर्ज अवैध..
सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील ५२ ग्रामपंचायत निवडणुकींच्या अर्ज छाननी प्रक्रियेत आज सातोसे सरपंचपद बिनविरोध झाले आहे. यापूर्वी चार ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध होणार असल्याचे जाहीर झाले होते. यात तांबोळी, गेळे, नेतर्डे आणि आजगाव आदी ग्रामपंचायतींचा समावेश होता. मात्र आता एकूण पाच ग्रामपंचायती बिनविरोध होणार आहेत, अशी माहिती तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीधर पाटील यांनी दिली.
दरम्यान सदस्य पदासाठी आलेल्या ९१७ अर्जांपैकी अर्ज अवैध ठरले आहे. त्यामुळे सद्यस्थिती सदस्य पदासाठी ९१४ सरपंच पदासाठी १८३ उमेदवार रिंगणात आहे. तसेच गेळे ग्रामपंचायत पूर्णतः विरोधी झाली असल्याची ही त्यांनी सांगितले. आजची अर्ज छाननी प्रक्रिया आज जिमखाना मैदानावरील बाळासाहेब प्रबोधनी केंद्रात पार पडली. त्यानंतर प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून श्रीधर पाटील यांनी ही माहिती दिली.
सावंतवाडी तालुक्यात एकूण ५२ ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. यासाठी दाखल करण्यात आलेल्या सरपंच पदाच्या आणि सदस्य पदाचे अर्ज छाननीची प्रक्रिया आज जिमखाना मैदान येथील निवडणूक कार्यक्रम केंद्रात पार पडली. प्रत्येक ग्रामपंचायत साठी स्वतंत्र टेबल या ठिकाणी लावण्यात आले होते. सुरुवातीला सरपंच पदाच्या अर्जाची छाननी प्रक्रिया पार पडली. त्यानंतर सदस्य पदासाठी दाखल उमेदवारी अर्जावर छाननी झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी दाखल झालेल्या एकूण १२ अर्जापैकी १, बांदा ग्रामपंचायत साठी ३९ अर्जापैकी १ तर वेगवेगळ्या ग्रामपंचायतच्या २२ अर्जापैकी १ अर्ज असे तीनही ग्रामपंचायतचे प्रत्येकी १ असे ३ अर्ज अवैध ठरले.
तसेच ५२ ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासाठी दाखल १८६ अर्ज वैद्य ठरले. अपूर्ण कागदपत्रामुळे सदस्य पदाचे अर्ज बाद झाल्याची माहिती तहसीलदार श्री पाटील यांनी दिली. आता ७ डिसेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सरपंच पदासाठी किती जण रिंगणात आहेत आणि सदस्य पदासाठी किती जण रिंगणात राहतील हे स्पष्ट होणार आहे. तर अजूनही काही गावांमध्ये सरपंच पद बिनविरोधी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सरपंच पदासाठी बिनविरोध ठरलेल्या ५ ग्रामपंचायतीमध्ये आणखीन ग्रामपंचायतीची भर पडण्याची शक्यता आहे.