You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा

युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांची मागणी

सावंतवाडी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात १०४ मंजूर पदांपैकी केवळ ७२ पद भरलेली आहेत. ३२ पद ही रिक्त आहेत. यात वैद्यकीय अधिक्षकांसह पूर्ण वेळ फिजीशीअनचा अभाव आहे. एकाच व्यक्तीवर अधिकचे पदभार आहेत. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना रूग्ण सेवा करणं मुश्किल झाले आहे. याची आरोग्य प्रशासनानं व राज्य सरकारनं गंभीरपणे दखल घेत तातडीनं पद भरावीत,अशी मागणी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केली.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ७० टक्के रूग्ण हे ग्रामीण भागातून येतात. मात्र, या गोरगरीब रूग्णांना मोफत उपचार, औषधासाठी तासंतास बसून रहावे लागते आहे. रिक्त असणारी महत्त्वाची पद आणि वाढलेला कारभार यामुळे डॉक्टरांची कसरत होत आहे. या प्रकारामुळे आरोग्य क्षेत्रात रूग्णांची होणारी परवड पुन्हा एकदा समोर आली असून रूग्णांना चांगले उपचार व चांगल्या सुविधा सरकारी रूग्णालयात कधी मिळणार असा सवाल उपस्थित होत आहे. याकरिता तर ग्रामीण भागातून येणाऱ्या रूग्णांकरीता सरकारी औषधालय हे दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवाव, अशी मागणीही सूर्याजी यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा