सावंतवाडी
केंद्र पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान (DAY-NULM) मध्ये सावंतवाडी नगरपरिषद समाविष्ट आहे. सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत सदर अभियानातील कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगाराची उपलब्धता या घटकांतर्गत शहरातील १५ ते ४५ वर्षे वयोगटातील बेरोजगार युवक / युवतींसाठी शासनाकडील नोंदणीकृत प्रशिक्षण संस्थामार्फत त्यांच्या आवडीप्रमाणे कोर्सचे मोफत कौशल्य प्रशिक्षण देऊन नोकरी / स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याप्रमाणे पुढील कोर्सचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. १. डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर (पात्रता १० वी पास), २. अकाऊंट एक्झिक्युटिव्ह (पात्रता १२ वी पास), सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील महिला (सर्व सामाजिक प्रवर्ग) तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील (BPL), सामाजिक व आर्थिक जनगणेतील कुटुंबातील (SECC), अनुसूचित जाती, अनु. जमाती, अपंग तसेच अल्पसंख्याक प्रवर्गातील १५ वर्षावरील जास्तीत जास्त युवक / युवतींनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी नगरपरिषदेकडील दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान (DAY- NULM) कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन शहर प्रकल्प अधिकारी तथा मुख्याधिकारी जयंत। जावडेकर यांनी केले आहे.