You are currently viewing मसुरे येथील शासकीय स्पर्धा  परीक्षा मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मसुरे येथील शासकीय स्पर्धा  परीक्षा मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

यशप्राप्ती साठी ध्येय वेडे व्हा ! सत्यवान रेडकर यांचे विध्यार्थ्यांना आवाहन

 

मालवण / मसुरे :

प्रशासकीय स्वराज्य निर्माण होताना कोकण आणि सिंधुदुर्गचा डंका दिल्ली पर्यंत पोचला पाहिजे. मी नववी मध्ये नापास विध्यार्थी, आज त्याच शाळेचा उच्च शिक्षित विध्यार्थी आहे. अपयशाने खचून न जाता निश्चयी व्हा. गुणांची टक्केवारी मिळवताना आत्मविश्वास सुद्धा असणे आवश्यक आहे. शासकीय अधिकारी गाव अशी ओळख आपल्या गावाची बनणे आवश्यक आहे. व्यसनापासून दूर राहा. स्पर्धा परीक्षेसाठी वेगळ्या क्लासची गरज नसून स्वअध्ययन करून सुद्धा यश मिळवता येते. ध्येय प्राप्तीसाठी आतोनात मेहनत करा. ध्येय वेडे बना. वेडे लोकच इतिहास निर्माण करतात. यशप्राप्तीतून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांच्या जीवनात आनंद देणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन तिमिरातून तेजाकडे या संस्थेचे अध्यक्ष व कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमा शुल्क -भारत सरकार श्री सत्यवान रेडकर यांनी येथे केले.

मालवण तालुका पत्रकार समिती, भंडारी समाज महासंघ आणि आर. पी. बागवे हायस्कूल व उच्च माध्यमिक तांत्रिक विद्यालय मसुरे यांच्या संयुक्त विद्यमाने बागवे हायस्कुल मसुरे येथे  आयोजित मोफत शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. सत्यवान रेडकर यांचे मसुरे येथील १३५ वे व्याख्यान होते. यावेळी व्यासपीठावर लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे, माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, मुख्याध्यापक किशोर चव्हाण, मालवण तालुका पत्रकार संघ महेश सरनाईक, विलास मेस्त्री, एस. आर.कांबळे, संजय बागवे, विठ्ठल लाकम, शिंगरे मॅडम, सौ. अर्चना कोदे , तालुका पत्रकार संघ उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, भरत ठाकूर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकार अंतर्गत विविध स्पर्धा परीक्षा व शिक्षणा नुसार नोकरीच्या संधी याबाबत रेडकर यांनी उपस्थित विध्यार्थी व पालक याना मार्गदर्शन केले.

यावेळी मसुरे एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष डॉ दीपक परब म्हणाले, सर्वसामान्य विध्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असे मार्गदर्शन रेडकर सर यांनी केलं. विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी व्हावे. तिमिरातून तेजाकडे या उपक्रमास भविष्यात आवश्यक सहकार्य वेळोवेळी मिळेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेश सरनाईक यांनी मार्गदर्शन करताना मालवण पत्रकार संघाच्या माध्यमातून सुद्धा भविष्यात अधिक व्यापक प्रमाणात अशा प्रकारचे मार्गदर्शन कार्यक्रम राबविले जातील अशी ग्वाही दिली. माजी जि प अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रमेश पाताडे, एन. एस. जाधव, समीर नाईक, सौ मसुरेकर, सिद्धेश हळवे, शशांक पिंगुळकर, भानुदास परब,पत्रकार संतोष अपराज, झुंजार पेडणेकर, अनिल मेस्त्री, भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुलच्या शिक्षिका सायली म्हाडगुत,पार्वती कोदे, रेश्मा बोरकर, तनुश्री नाबर, चरणदास फुकट, श्री मसुरकर तसेच पालक , शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन भरत ठाकूर, प्रास्ताविक मुख्याध्यापक किशोर चव्हाण, आभार सौ. अर्चना कोदे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा