You are currently viewing ऊबदार शाल

ऊबदार शाल

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ संजना जुवाटकर लिखित अप्रतिम लावणी रचना*

*ऊबदार शाल*

हुडहुड्या थंडीने कहर केला आजकाल
अन् राया मला, आणा हो ऊबदार शाल ll धृ ll

गुलाबी थंडीने आली बघा, अंगी गोड शिरशिरी
कशी आवरू मी सांगा, घरधनी तुम्ही तरी
जवळ घ्या मज.. करते तुम्हां ज्वानी ही बहाल
अन् राया मला, आणा हो ऊबदार शाल ll १ ll

जवळी घेता या इश्काची sss… या इश्काची….
जवळी घेता या इश्काची शेकोटी बघा पेटली
अंगांगातून मदमस्त काया कशी माझी नटली
कवेत घेउनी दावा की.. पिरतीचा हा ताजमहाल
अन् राया मला, आणा हो ऊबदार शाल ll २ ll

गुलाबी थंडीची रात , तुम्हांमुळे राया सजली
गालां-ओठांवर मर्दानी छाप कशी रसरसली
तुमच्या मिठीतल्या ऊबेचा,उधळू चला गुलाल
अन् राया मला… अन् सख्या मला… नका आणू हो..ऊबदार शाल ll ३ ll

सौ. संजना विद्याधर जुवाटकर
कळवा, ठाणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा