मसुरे येथील शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवण
प्रशासकीय स्वराज्य निर्माण होताना कोकण आणि सिंधुदुर्गचा डंका दिल्ली पर्यंत पोहोचला पाहिजे. शासकीय अधिकाऱ्यांचे गाव अशी ओळख आपल्या गावाची बनणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेसाठी वेगळ्या क्लासची गरज नसून स्वअध्ययन करून सुद्धा यश मिळवता येते हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवून ध्येय प्राप्तीसाठी अतोनत मेहनत करावी. यश प्राप्तीतून प्रत्येकाने आपल्या आई वडिलांच्या जीवनात आनंद देणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन तिमिरातून तेजाकडे या संस्थेचे अध्यक्ष व मुंबई सीमा शुल्क विभागाचे
कनिष्ठ अनुवाद अधिकारी श्री सत्यवान रेडकर यांनी येथे बोलताना केले.
मालवण तालुका पत्रकार समिती, भंडारी समाज महासंघ आणि आर. पी. बागवे हायस्कूल व उच्च माध्यमिक तांत्रिक विद्यालय मसुरे यांच्या संयुक्त विद्यमाने बागवे हायस्कुल मसुरे येथे आयोजित मोफत शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. सत्यवान रेडकर यांचे मसुरे येथील १३५ वे व्याख्यान होते. यावेळी व्यासपीठावर लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे, माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, मुख्याध्यापक किशोर चव्हाण, जिल्हा पत्रकार संघ उपाध्यक्ष महेश सरनाईक, विलास मेस्त्री, एस. आर.कांबळे, संजय बागवे, विठ्ठल लाकम, शिंगरे मॅडम, सौ. अर्चना कोदे , तालुका पत्रकार संघ उपाध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, भरत ठाकूर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी प्रास्ताविक मुख्याध्यापक किशोर चव्हाण यांनी केले
यावेळी बोलताना सत्यवान रेडकर म्हणाले, विद्यार्थ्यानी ध्येय वेडे बनावे वेडे लोकच इतिहास निर्माण करतात.
मी नववी मध्ये नापास झालेला विध्यार्थी होतो पण आज त्याच शाळेचा उच्च शिक्षित विध्यार्थी आहे. अपयशाने खचून न जाता निश्चयी व्हा. गुणांची टक्केवारी मिळवताना आत्मविश्वास सुद्धा असणे आवश्यक आहे. शासकीय अधिकाऱ्यांचे गाव अशी ओळख आपल्या गावाची बनणे आवश्यक आहे. व्यसनापासून दूर राहावे असे सांगून त्यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार अंतर्गत विविध स्पर्धा परीक्षा व शिक्षणानुसार नोकरीच्या संधी याबाबत उपस्थित विध्यार्थी व पालक याना मार्गदर्शन केले.
यावेळी मसुरे एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष डॉ दीपक परब यांनी सर्वसामान्य विध्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असे मार्गदर्शन रेडकर सर यांनी केलं. विद्यार्थ्यांनी परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी व्हावे. तिमिरातून तेजाकडे या उपक्रमास भविष्यात आवश्यक सहकार्य वेळोवेळी मिळेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेश सरनाईक माजी जि प अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रमेश पाताडे, एन. एस. जाधव, समीर नाईक, सौ मसुरेकर, सिद्धेश हळवे, शशांक पिंगुळकर, भानुदास परब, पत्रकार संतोष अपराज, झुंजार पेडणेकर, अनिल मेस्त्री, भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुलच्या शिक्षिका सायली म्हाडगुत,पार्वती कोदे, रेश्मा बोरकर, तनुश्री नाबर, चरणदास फुकट, श्री मसुरकर तसेच पालक , शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन भरत ठाकूर यांनी केले तर आभार सौ. अर्चना कोदे यांनी मानले.