You are currently viewing भाजपकडून प्रभाग २ मधून महिला खुल्या प्रवर्गातून उच्चशिक्षित सौ. श्रेया शैलेश केसरकर रिंगणात

भाजपकडून प्रभाग २ मधून महिला खुल्या प्रवर्गातून उच्चशिक्षित सौ. श्रेया शैलेश केसरकर रिंगणात

सावंतवाडी :

 

बांदा ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही पॅनेलकडून नवीन चेहरे निवडणूक रिंगणात उतरण्यात आले आहेत. भाजपकडून प्रभाग २ मधून महिला खुल्या प्रवर्गातून उच्चशिक्षित सौ. श्रेया शैलेश (साईशकुमार) केसरकर यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

प्रभाग २ मधून सौ. श्रेया केसरकर यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एलएलबीची पदवी घेतलेल्या सौ. श्रेया केसरकर यांचा सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यातून लोकांशी संपर्क आहे. तसेच त्यांचे पती शैलेश केसरकर यांचे शालेय वस्तू विक्रीचे बाजारपेठेत दुकान असल्याने या प्रभागात त्यांची मतदारांशी ओळख असल्याने त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. तसेच भाजपयुमो जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांच्या मुस्लिमवाडीतील मतदारांची मतेही त्यांना मिळू शकतात. त्यामुळे या प्रभागात गाव विकास पॅनेलच्या सौ. अमृता महाजन विरुद्ध सौ. श्रेया केसरकर यांची राजकीय लढत जोरदार होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा