*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गझल रचना*
*स्वच्छंदी*
झालो जरा स्वच्छंदी छंदास पाळल्यावर,
चिंतेस मीच माझ्या वेचून जाळल्यावर!
रमलो कधीच नाही उपऱ्या सुखात येथे,
परिपक्व होत गेलो दुःखास माळल्यावर!
मानापमान झाले असुया उरात त्यांच्या,
गेलो पुढे तयांच्या त्यांनाच टाळल्यावर!
कोणीच देत नाही कोणास भाव साधा,
होणार फायदा ना अश्रूंस गाळल्यावर!
माणूस स्वैर वारू स्वार्थात आंधळासा,
तो बेलगाम होतो पैशास भाळल्यावर!
जयराम धोंगडे, नांदेड
9422553369
■■■■■■■■■■■■■■