*वक्रतुंड साहित्य समूहाचे प्रमुख लेखक कवी जगन्नाथ खराटे लिखित अप्रतिम लेख*
*संगणक, शाप की वरदान??*
आमच्या लहानपणी आम्ही वाणसामन आणायला दुकानात जात असु ,अन् उसनवारीचा व्यवहार असल्यानं तेव्हा वाणी एक जुनाट वही काढुनी त्यांत सामानाची नोंद करुन लिहून ठेवायचा,अगदी पुर्विपासुन ही पद्धत होती.. हळूहळू काळ बदलत गेला अनं पद्धतींत बदल होत गेले, व्यवहारात जमाखर्चाच्या लिखीत नोंदीला अत्यंत महत्त्व असल्याने त्या व्यवहाराची जागा टाईपरायटरने घेतली, व सर्व व्यवहार टंकलिखीत होवु लागला .. नंतर, प्रिटिंग मशीन येवुन मोठ्या प्रमाणावर व्यवहार अथवा पुस्तके ही लिखींत स्वरूपात ह़ोवु लागली.. पन् बदल हा निसर्गाचा नियम असल्याने मानवी बुद्धीलाही बदल अपेक्षित होता.अन् तेव्हा मांनवी बुद्धीने भरारी मारुन गरुडझेप झेप घेतली अन् संपुर्ण विश्व अगदी नजरेसमोर आणलं.. ते एका शोधाने.. अन् तो शोध म्हणजे संगणकाची निर्मिती….
संगणक, संगणक म्हणजे माहितींचा खजीना असलेली अलिबाबाची गुहांच. हो खरोखरच, संगणक हे मानवासाठी एक वरदान ठरलं.. गरज ही शोधाची जननी आहे,ह्या वचनानुसार पुर्विच्या काळी, माहिती जर एका यंत्रात साठवली गेली तर, किती छान होईल? अशी कल्पना, चार्ल्स बॅबेज ह्या शास्त्रज्ञाला वाटले.मग, त्याने नवनवीन प्रयोग सुरु केले, अन् अशा प्रयोगांतुन त्याने १८३२साली प्राथमिक स्वरूपात संगणक तयार केला. त्याच्या म्रुत्युनंतर त्याच्या मुलाने, हळूहळू त्यांत सुधारणा करुन ई.सन.१८८८साली विष्लेशनात्मकष संगणक बवनला. पन् तरीही,त्यात काही त्रुटी असल्याने.१९४५साली,जे, प्रेस्टन एकर्ट ,आणि जॉन माऊचल ह्या दोन शास्त्रज्ञांनी अद्यावत संगणक बनवला. अशा तर्हने माहिती,विष्लेशन आणि तंत्रज्ञानाची ही अलिबाबाची गुहा असलेला संगणक तयार झाला.. आता हा संगणक, मानवाच्या सेवेसाठी सदैव समोर हात जोडून आहे.. खरं तर मानवी बुद्धीला सुटलेलं खुप मोठं कोडं आहे… स़गणक म्हणजे, मानवी वेळ, पैसा आणि कार्यक्षमता बचतीचा अशा प्रगतीचा हा महामार्ग ठरला आहे.. संगणकाचे फायदे अनेक आहेत , त्यापैकी, अवकाशातील खगोलीय घडामोडी तंत्रज्ञान, शेतीविषयक माहिती, शासकीय क्षेत्रातील उपयुक्तता, शिक्षण, वेद्यकीय,पर्यटन,वाहतूक यंत्रणा, दैनंदिन जीवनातील अन् वस्त्र निवारा , मनोरंजन जगत, बांधकाम तंत्रज्ञान संदर्भात माहिती व त्याद्रुष्टीने नवनवीन संकल्पना, इत्यादी अनेक गरजांची पुर्तता करण्यासाठी संगणक तंत्रज्ञान हे सदैव तयार असतै अशें हे अनेक फायदे मानवाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अतिषय उपयुक्त ठरत आहे.. हे आपण दररोजंच पाहत आहोत. ह्या उपयुक्तततेनुसार संगणक वरदान ठरते…..
पन् , चलनी नाण्याच्या दोन बाजू असतात त्याप्रमाणे संगणक तंत्रज्ञान हेसुद्धा कधीं, कधीं नुकसान कारक किंबहुना शापदेखील ठरते हे विचारात घेतले पाहिजे.. फायद्यासोबत तोटा सुद्धा असतोच..पन् हा तोटा किंवा नुकसान हे संगणकाच्या गैरवापरामुळे होऊ शकते..ह्या जगात जशी चांगल्या प्रवृत्तीची माणसं आहे तशी वाईट प्रवृत्तीची सुद्धा आहे अन् अशी मानसं ही आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी इतरांच्या नुकसानीची पर्वा करित नाही.. त्यामुळे गुन्हेगारी व्यक्ती ही संगणकीय प्रणालीचा दुरुपयोग करून घेत असते.. आपली वैयक्तिक माहिती मिळवुन बॅंकखाते रिकामे करणे, एखाद्याला, ब्लॅकमेल करून धमकी देणे, किंवा देशाची अत्यंत महत्वाची माहिती चोरुन ती शत्रुदेशांना पुरवने, अशी अनेक उदाहरणे देता येतील.. अशाप्रकारे संगणक हे वरदान असले तरी आपन सदैव सावधान राहुन त्याकडे लक्ष ठेवायला हवे. सामान्य नागरिकांनी आपली वैयक्तिक माहिती ही अनोळखी व्यक्तीला देवु नये. किंवा तसं काही नजरेस आलं तर ते सायबर सुरक्षा यंत्रणेला कळवले पाहिजे.. त्यासोबत,जनतेच्या तक्रारीचे. त्वरीत निवारन करुन सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तत्पर असने हे शासनाचे कर्तव्य ठरते. शेवटी लोकांचे कल्याणाचे हे ध्येय ध्यानात ठेवने हे लोकशाही रक्षणासाठी महत्त्वाचे ठरते..
खरंतर , संगणक तंत्रज्ञानाचा योग्य वापर हे मानवी जीवनासाठी वरदान ठरते.. अन् गैरवापर हा तर मोठा शांप ठरतो हे सदैव लक्षात ठेवुन संगणक तंत्रज्ञानाशी जवळीक ठेवायला हवी . बरोबर ना???
©️श्री-जगन्नाथ खराटे– ठाणे
२ डिसेंबर २०२२..