कुडाळ :
जागतिक एड्स दिनानिमित्त बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या वतीने कुडाळ मध्ये जनजागृती फेरी काढून पंथ नाट्य सादर करण्यात आले. एक डिसेंबर हा दिवस जगभर जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. अजूनही समाजामध्ये या आजाराविषयी भीती आहे. आजही एड्स विषयी संकुचित मानसिकता आहे आणि याचे मुख्य कारण म्हणजे या आजाराविषयी असणारे अज्ञान.
एड्स या आजाराचा प्रसार नक्की कुठल्या मार्गाने होतो हे बऱ्याच जणांना अजूनही माहित नाही. अनैतिक लैंगिक संबंध हा एकच मार्ग या आजाराचा प्रसाराचा मार्ग आहे असा समाजामध्ये गैरसमज आहे; परंतु फक्त हा एकच आजार प्रसाराचा मार्ग नसून एड्स आजाराने बाधित असणाऱ्यांनी रक्तदान केल्यास, तसेच एक पेक्षा जास्त रुग्णांना एका सुईचा वापर करणे, अमली पदार्थ एकाच इंजेक्शनद्वारे अनेकांनी टोचून घेणे, किंवा एड्स संक्रमित गर्भवती मातीकडून तिच्या होणाऱ्या बालकाला देखील काही प्रमाणात आजार होऊ शकतो. असे अनेक मार्ग आहेत आणि याची जागृती समाजामध्ये करणे गरजेचे आहे. म्हणून या दिनाचे औचित्य साधून बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अकॅडमी कुडाळच्या वतीने कुडाळ शहरात बाजारपेठेत जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीमध्ये बी.एस्सी नर्सिंग द्वितीय वर्ष व जीएन..एम प्रथम वर्षाच्या मुलांनी उस्फूर्त सहभाग घेतला होता. या आजारा संदर्भात संदेश देणाऱ्या घोषणा देत आंबेडकर नगर कुडाळ ते संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ या मार्गावर जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या जनजागृती फेरी दरम्यान विद्यार्थी -विद्यार्थिनींनी कुडाळ बस स्टँडच्या समोर पथनाट्य सादर केले. या जनजागृती फेरीला प्राचार्य कल्पना भंडारी प्रा.प्रथमेश हरमलकर,,प्रा. प्रणाली मयेकर ,प्रा.पूजा म्हालटकर,प्रा. वैजयंती नर,प्रा. प्रियंका माळकर,प्रा. नेहा महाले,प्रा. ऋग्वेदा राऊळ,प्रा. गौतमी माईंनकर तसेच प्रसाद कानडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.