वेंगुर्ला :
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव 2022 अंतर्गत म्हापण केंद्रबलाचा क्रीडा महोत्सव दिनांक 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर रोजी केंद्रशाळा म्हापण येथे संपन्न झाला.
या महोत्सवात 50, 100 रिले हे धावप्रकार, कबड्डी, खोखो हे सांघिक क्रीडाप्रकार तसेच लांबउडी, उंचउडी हे वैयक्तिक खेळप्रकार खेळवले गेले. तसेच ज्ञानी मी होणार, समुहगान व समुहनृत्य या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या क्रीडा महोत्सवात केंद्रातील 10 शाळांनी भाग घेतला होता.
उद्घाटनप्रसंगी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. प्रमोद गावडे, केंद्रमुख्याध्यापक श्री. उल्हास मेतर, उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री. महेश परुळेकर, श्रीम. श्रद्धा ठाकूर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. नार्वेकर, श्री. घुले तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उमेश निवतकर यांनी केले. श्री. प्रशांत खेडकर यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी सर्व निकालपत्र ,डिजिटल माध्यमातून ज्ञानी मी होणार स्पर्धा यासाठी तंत्रस्नेही शिक्षक श्री योगेश संकपाळ यांचे विशेष सहकार्य लाभले.