You are currently viewing साटेली-भेडशी येथे भव्य दशावतारी नाटयमहोत्सवाला उद्यापासून सुरुवात

साटेली-भेडशी येथे भव्य दशावतारी नाटयमहोत्सवाला उद्यापासून सुरुवात

दोडामार्ग

शुक्रवार दिनांक 02 डिसेंबर ते ६ डिसेंबर 22 या कालावधीत दोडामार्ग तालुक्याचे लोकनेते सुरेशभाई दळवी यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त पाच दिवसीय नाट्य महोत्सव साजरा करण्यात येत आहे. दोडामार्ग तालुक्याच्या विकासात, समाजकारण व राजकारण यामध्ये सुरेशभाई यांचे आदरणिय स्थान आहे. सिंधुदर्श जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व अध्यक्ष असताना दोडामार्ग तालुक्यातील बारमाही रस्ते निर्माण करणे, विज, पाणी, शिक्षण या गरजा ओळखून सन १९९२ ते ९.७ या कालावधीत मेहनतीने कामे करून घेतलीत. सन 2014ते 2021 था ७ वर्षाच्या कालावधीत पण सिंधुदुर्ग बँकेच्या माध्यमातून शेतकरी बांधवाना कर्ज उपलब्ध करून त्यांची आर्थिकास्थिती मजबूत करण्याकरीता सहकार्य केले.

६ डिसेंबर 2022 रोजी होणाऱ्या ६६ व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सुरेशभाई दळवी मित्रमंडळ व हितचिंतक यांनी दिनांक 2 ते ६ डिसेंबर या कालावधीत संध्याकाळी ६.३० या नाट्य महोत्सवाचे आयोजन केलेले आहे गणेशोत्सव मंडळ साटेली-भेडशीच्या रंगमंचावर हा नाट्य महोत्सव होणार असून यामध्ये दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग,अष्टविनायक – निरवडे, महापुरुष-सांकरी कलेश्वर- नेरुर, चेंदवणकर (देवेंद्र नाईक प्रस्तुत) नाट्यमंडळ किमिचक्र वध, माहेरवाशिणी भवानी खाई, कृष्ण परतूनी येई गोली, विधीलेख, गौरी स्वंयंकर हे प्रयोग होणार आहे. याचा लाभ नाट्यरसिकांनी घ्यावा असे आवाहन सुरेशभाई दळवी मित्रमंडळ हितचिंतक, साटेली-भेडशी देवस्थान कमिटी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा