जिल्ह्यात 23 ऑक्टोबर पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता…

सिंधुदुर्गनगरी :

जिल्ह्यात पुढाल चार दिवस म्हणजेत दिनांक 23 ऑक्टोबर 2020 रोजीपर्यंत विजां चमकण्याबरोबरच गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी वर्तवली आहे. तरी त्या अनुषंगाने नागरिकांनी पुढील खबरदारी घ्यावी. विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा, विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी अश्रय घ्यावा. विजेच्या खांबापासून लांब रहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली अश्रयास थांबू नये, विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे, धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात, विज पडण्याची पूर्वसूचना व माहिती मिळण्यासाठी नागरिकांनी आपल्या मोबाईलवर दामिनी ॲप इंस्टॉल करावे.
तसेच या कालावधीत किनारपट्टीवर 40 ते 50 कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कक्षातर्फे देण्यात आला आहे.
कोणताही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष 02362-228847/1077 आणि जिल्हा पोलीस नियंत्रणकक्ष – 02362-228614, मालवण तहसिल नियंत्रण कक्ष – 02365-252045, देवगड तहसिल नियंत्रण कक्ष – 02364-262204, वेंगुर्ला तहसिल नियंत्रण कक्ष – 02366-262053, दोडामार्ग तहसिल नियंत्रण कक्ष – 02363-262204, सावंतवाडी तहसिल नियंत्रण कक्ष – 02363-272028, कुडाळ तहसिल नियंत्रण कक्ष – 02362-222525, कणकवली तहसिल नियंत्रण कक्ष – 02367-232025, वैभववाडी तहसिल नियंत्रण कक्ष – 02367-237239 येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कक्षातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा