You are currently viewing नातं….!

नातं….!

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास पवार आण्णा लिखीत अप्रतीम काव्यरचना*

*नातं….!*

तुम्ही म्हणजे मोती, मी फक्त धागा आहे
म्हणून का होईना, तुमच्यात जागा आहे

तुमच्या प्रतिसादाने, मला सारे कळते
जसे तेल आणि वाती, सोबतच जळते

सुदामा सारखी नाही, पण गोड आहे
म्हणूनच भेटीची, मला ओढ आहे

मला सुद्धा अभिमान, आहे खुप तुमचा
तुम्हाला कायम जपावे, हाच हेतु आमचा

कधी चुकत असेल तर, मन मोठं करावे
घागर नको भरलेली, ओंजळीत धरावे

जसा तसा आहे पण, ऋणात मला ठेवा
मला तुमच्या नात्यांचा, खुप आहे हेवा

रामदास आण्णा

प्रतिक्रिया व्यक्त करा