३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी विद्युत पुरवठा खंडित होऊन भारनियमन करावे लागण्याची शक्यता
महापारेशन कंपनीद्वारे ४०० केव्ही कोल्हापूर व कोल्हापूर -१ वाहिनीच्या तरा बदलण्याचे काम २२० केव्ही तलंडगे ते सावंवाडी व तलंडगे ते विर्डी वाहिनी बंद करण्यात येणार असून सदर कालावधीत २२० केव्ही अती उच्चदाब इन्सुली सब केंद्रावरील लोड कुडाळ उच्चदाब सबकेंद्रावर स्थलांतरित करण्यात येणार आहे. सदर स्थलांतरण करत असताना दोन दिवसांकरिता केवळ एक वीज पुरवठा उपलब्ध राहणार आहे. यावेळी महावितरण कडून ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा देण्याचा प्रयत्न राहील, परंतु विद्युत पुरवठ्यामध्ये काही तांत्रिक बिघाड उत्पन्न झाल्यास काही काळ भारनियमन करण्याची गरज भासू शकते. अशावेळी ११ केव्ही फिडरवर चक्राकार पद्धतीने प्रत्येकी एक तासाचे भारनियमन करण्यात येईल. सदर बाबीची ग्राहकांनी व व्यापारी वर्गाने नोंद घेऊन महावितरणला सहकार्य करण्यात यावे अशी नम्र विनंती केली आहे.
दिनांक ३०/११/२२ व १/१२/२२ या दोन दिवसात महाराष्ट्र विद्युत वाहीनीत बदल करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे दोन दिवसात काम चालू असतानाच लाईट जाण्याची शक्यता महाराष्ट्र विद्युत मंडळाने जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांना तसेच व्यापारी संघालाही दिलेली आहे. कृपया सर्व ग्राहक व व्यापारी बंधु-भगिनींनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.