सिंधुदुर्गनगरी
कृषि अवजारे बँक या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गट, नोंदणीकृत शेतकरी सहकारी संस्था तसेच शेतकरी उत्पादन कंपन्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जास्तीत -जास्त अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, डी.एस. दिवेकर यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सन २०२२-२३ या वर्षाकरीता कृषि यांत्रिकिकरण उपअभियान योजनेंतर्गत एकूण १ कोटी ५९ लाख ८० हजार राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकिकरण योजनेंतर्गत एकूण १ कोटी ६० लाख ३६ हजार व राष्ट्रीय कृषि योजना कृषि यांत्रिकिकरण योजनेंतर्गत एकूण १ कोटी ३ लाख ५६ हजार असे एकूण ४ कोटी २१ लाख २५ हजार निधी प्रस्तावित आहे. त्यापैकि कृषि यांत्रिकिकरण उपअभियान योजनेतर्गत एकूण १ कोटी ५९ लाख ८० हजार राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकिकरण योजनेतर्गत एकूण १ कोटी ४४ लाख ९२ हजार व राष्ट्रीय कृषि योजना कृषि यांत्रिकिकरण योजनेंतर्गत एकूण ९८ लाख ९१ हजार असे एकूण ४ कोटी ३ लाख ६३ हजारांचा निधी लाभार्थीच्या खाती रक्कम वर्ग केला आहे. (पॉवर टिलर, ट्रॅक्टर, पॉवर विडर, ब्रश कटर, मळणी यंत्र, कापणी यंत्र, रीपर व इतर)
जिल्ह्यात कृषि क्षेत्रामध्ये कृषि यांत्रिकीकरण हे फार महत्वाचे आहे. दिवसेंदिवस शेती कामाकरिता मजूरांची कमतरता भासत आहे. त्याप्रमाणे औद्योगिकीकरण, नागरिकिकरण तसेच कृषि क्षेत्रात मजूर उपलब्ध होत नाहीत. वाढत्या महागाईमूळे मजूरांचे दर परवडत नाहीत. कृषि क्षेत्रात कृषि अवजारे आणि यंत्रे यांना अनन्यसाधारण महत्व आहे. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात हे महत्वाचे प्रमुख पीक असून त्यासाठी चिखळणी, उखळणी, लागवड, फवारणी व काढणीसह सर्व प्रकारच्या कामाकरीता यंत्र उपलब्ध आहेत.
जिल्ह्यात धरण क्षेत्र कमी असल्याने वैयक्तिक यंत्रे खरेदी करण्यासाठी मर्यादा आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता कृषि विभागामार्फत कृषि यांत्रिकिकरण उपअभियान, राज्य कृषि यांत्रिकिकरण, तसेच राष्ट्रीय कृषि योजना, कृषि यांत्रिकिकरण योजनेअंतर्गत वैयक्तिक कृषि अवजारे, कृषि अवजारे बँक स्थापनेकरीता शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी, नोंदणीकृत शेतकरी सहकारी संस्था यांना अर्थसाहाय्य केले जाते. जिल्ह्यातील पीक रचनेनुसार पिकांच्या पेरणीपासून काढणीपच्छात प्रक्रियेपर्यंत शेतकऱ्यांना माफत दराने यांत्रिकिकरणाची सेवा- सुविधा भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन देणे तसेच लहान व सीमांतिक शेतकऱ्यांना कृषि यांत्रिकिरण सुविधेचा लाभ देणे हा या घटकाचा मुख्य उद्देश आहे.
यांत्रिकिकरण या घटकाकरीता पूर्व समत्ती प्राप्त झाल्यानंतर औजारे अधिकृत कंपनीचे विक्रेत्याकडून खरेदी करावे, शेतकऱ्यांची फसणूक होणार नाही. त्यामुळे जास्ती जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा.