You are currently viewing गळाने मासे पकडण्याच्या राष्ट्रस्तरीय स्पर्धेत रत्नागिरीचे अभी सावंत विजयी

गळाने मासे पकडण्याच्या राष्ट्रस्तरीय स्पर्धेत रत्नागिरीचे अभी सावंत विजयी

मालवण

ऑल इंडिया गेम फिशिंग असोसिएशन तर्फे मालवण तालुक्यातील तोंडवळी समुद्रकिनारी आयोजित केलेल्या गळाने मासे पकडण्याच्या राष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीचे अभी सावंत यांनी वर्ल्ड सर्फ चॅम्पियनशीप २०२२’चा किताब पटकाविला. त्यांना ‘अली हुसैनी मेमोरियल कप २०२२’ तसेच रोख रकमेसह इतर आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

शाश्वत मासेमारी बाबत जाणीवजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ऑल इंडिया गेम फिशिंग असोसिएशनतर्फे ‘वर्ल्ड सर्फ चॅम्पियनशीप २०२२’ ही स्पर्धा आयोजित केली जाते. तोंडवळी किनाऱ्यावर ही स्पर्धा दुसऱ्यांदा घेण्यात आली. या स्पर्धेत गळाने मासे पकडून तो किनाऱ्यावर आणल्यावर त्यांचे छायाचित्र घेऊन माशाची प्रजाती, लांबी, रुंदी, वजन आदी माहितीची नोंद घेऊन त्या माशांना पुन्हा समुद्रात जिवंत सोडण्यात आले. या स्पर्धेत देशभरातील तब्बल ९० मच्छीमार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेत चेन्नईच्या सय्यद निहाज अहमद यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तर केरळच्या जेम्स कुटी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. मळगाव- सावंतवाडी येथील सच्चिदानंद मेस्त्री चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरले. त्यांना ‘स्पिसीज ‘चॅम्पियन’ म्हणून गौरविण्यात आले. प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे ५० हजार, ३५ हजार आणि २० हजार रुपये तसेच इतर आकर्षक बक्षिसे देण्यात आली. तळाशील समुद्र किनारी पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा