You are currently viewing सिंधुदुर्गात ग्रा. पं. निवडणुकीत भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत युती

सिंधुदुर्गात ग्रा. पं. निवडणुकीत भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत युती

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती

सावंतवाडी :

आगामी काळात होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुका भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्र येवून लढणार आहे तसा फाॅर्मुला ठरला आहे, अशी घोषणा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज सावंतवाडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

आज झालेल्या ऑनलाइन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. काही ठिकाणी स्थानिकांना निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली आहे. शक्य असलेल्या ठिकाणी ही युती असेल, संख्याबळ असेल त्या ठिकाणी पर्याय असेल असेही त्यांनी सांगितले. श्री तेली यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी महेश सारंग, मनोज नाईक, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, अशोक दळवी, महेश धुरी, संजय माजगावकर, परिक्षित मांजरेकर, नारायण राणे, दिलीप भालेकर, केतन आजगांवकर, शेखर राणे, सुनिल पारकर, महेद्र सावंत, भूषण परूळेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा