हिंदू जनजागृती समितीची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर…
सिंधुदुर्गनगरी
मुंबईतील हिंदू तरुणी श्रद्धा वालकर हिची निर्गुण हत्या करणाऱ्या आफतापला तात्काळ फासावर द्या, तसेच अशा घटना रोखण्यासाठी लव जिहाद विरोधी कठोर कायदा करावा. अशा मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले.
राज्यात “लव्ह जिहाद” ची समस्या गंभीर रुप धारण करत असून अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. खोटी ओळख, नाव सांगून मुस्लिम युवकांकडून हिंदू युवतींची फसवणूक केली जात आहे. त्यांना धर्मांतरासाठी जबरदस्ती केली जाते. ही बाब अत्यंत गंभीर असून अशा घटना रोखण्यासाठी महाराष्ट्रात तात्काळ लव्ह जिहाद विरोधी कायदा व धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची अत्यंत गरज आहे.
महाराष्ट्र राज्यात अनेक हिंदू युवती लव्ह जिहाद च्या जाळ्यात अडकल्या आहेत. अशा घटनांमध्ये अनेक हिन्दू तरुणीचा बळी गेला आहे. अशाप्रकारे नुकत्याच घडलेल्या घटनेत मुंबईतील श्रद्धा वालकर या हिंदू युवतीचे अनेक तुकडे करून निर्गुण हत्या करण्यात आली. ही हत्या करणाऱ्या नराधम आफतापला तात्काळ फासावर लटकवावे. तसेच अशा घटना रोखण्यासाठी लव्ह जिहाद विरोधी कायदा व धर्मांतर विरोधी कायदा राज्यात लागू करावा. अशी मागणी या निवेदनातून राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन हिंदू जनजागृती समिती सिंधुदुर्ग च्या वतीने निवासी उप जिल्हाधिकारी जयकृष्ण फड यांच्याकडे आज सादर करण्यात आले आहे. या निवेदनातून त्यांनी विविध घटनांकडे लक्ष वेधताना विविध मागण्या केल्या आहेत.
प्रमुख मागण्या
श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी द्या, राज्यातून महिला आणि मुली बेपत्ता होण्यामागे लव्ह जिहाद चा प्रकार तर नाही ना, याची चौकशी करण्यासाठी गृह खात्याने स्वतंत्र पथक नेमावे, राज्यात लव्ह जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतर बंदी कायदा तात्काळ लागू करावा, लव्ह जिहाद ची प्रकरणे हाताळण्यासाठी व त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी. तसेच अश्या प्रकरणातील आरोपीवर लव जिहाद च्या नावाखाली गुन्हे दाखल करावेत. यासाठी विदेशातून होणारा अर्थ पुरवठा, युवतीची तस्करी आणि त्याचा आतंकवाद कारवाईसाठी होणारा वापर याची चौकशी करून त्यात सापडलेल्या दोषींवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी हिंदू जनजागृतीचे पदाधिकारी गजानन मुंज परेश साटम अर्चना साटम सुरेश दाभोळकर अंजली साठव प्रतीक जगताप आदी उपस्थित होते