*भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश समिती (महाराष्ट्र राज्य) पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे यांचा लेख*
*लेखणी….!*
तलवारी पेक्षा धारदार शस्त्र म्हंजे लेखणी होय. आपल्यावर होणारा व आपल्या समाजावर होणारा अन्याय अत्याचार याला वाचा फोडण्याचे काम वार्ताहर करत असतात. त्यांना सर्वात महत्वाचे हत्यार दिले आहे ते म्हणजे लेखणी होय.
पत्रकार हा आपल्या सिंहस्थातील चौथा स्तंभ म्हणून गणला जाणारा अविभाज्य घटक म्हणजे संपादक. वार्ताहर. पत्रकार. लेखक. यांना महत्वाचे स्थान देण्यात आले आहे.
लेखणी मुळे संविधान तयार झाले. जुन्या संतांचे. नेत्यांचे. क्रांतिकारी. समाजसेवक. महान मुस्लिम. हिंदू धर्मग्रंथ . आपण शिक्षण घेण्यासाठी वापरतो ही पुस्तके. सर्वच व्यवहार. लेखणी मुळेच चालतात. महत्वाचे काम कुणी केल असेल तर ते लेखणी मुळे शक्य झाले आहे.
लोकमान्य टिळक यांनी आपल्या गावात शहरात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये घडणारी शुभ अशुभ घटना गावातील लोकांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी वाचता यावे यासाठी पहिलें वृतमानपत्र सुरू करण्यात आले ते म्हणजे केसरी होय. हे लिहताना सुध्दा लेखणीने आपले महत्वाचे काम केले आहे.
आपण संपर्काच्या क्षेत्रात काम करतो. त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या घटकांशी आपला जेवढा संपर्क तेवढे आपले माहितीचे स्रोत (सोर्स) अधिक असतात. केवळ अधिका-यांशी किंवा पुढा-यांशी संपर्क ठेवला म्हणजे आपल्याला सर्व माहिती मिळू शकते, असे समजू नये. त्यांच्याएवढेच अगदी चतुर्थश्रेणी कर्मचा-यांपर्यंतचे सर्व कर्मचारी, गावपातळीपर्यंतचे कार्यकर्तेही महत्वाचे असतात. याबरोबरच उद्योजक, व्यापारी, डॉक्टर्स, वकील, विविध विषयांतील तज्ज्ञ मंडळी, संघटनांचे पदाधिकारी आदींशी आपण नेहमी त्यांच्या क्षेत्रातील विषयांवर चर्चा केली पाहिजे. त्यामुळे त्या त्या क्षेत्रात काय चालले आहे, हे आपणास माहिती होईल व त्या क्षेत्रातील बातमी लिहिताना आपणास अडचण येणार नाही. जिल्हा आणि तालुका पातळीवरील बातमीदारास केव्हा, कोणत्या विषयावर बातमी लिहावी लागेल हे सांगता येत नाही. या संपर्काचा फायदा अशा वेळी होईल. डिझेल, पेट्रोलचे भाव कमी- जास्त झाल्यास त्याचा ग्रामीण अर्थकारणावर काय परिणाम होऊ शकतो किंवा कांदा, बटाट्याचे उत्पादन घटल्यानंतर सरकारला त्याला कसे तोंड द्यावे लागते हे आपणास माहीत असायला हवे.
आज पत्रकारीता नेते खासदार आमदार मंत्री गुन्हेगार. यांच्या खुटयांला बांधली आहे. आज सर्वच ठिकाणी हा नेता काय म्हणाला. कोण प्रदेशात पळून गेला. कोणाचें कोणाबरोबर लग्न झाले कितव झाले. सिनेसटार याचं कुत्र मेल. नेत्यांच्या मुलांचं लग्न. कुणी काय घोटाळा करुन किती माया गोळा केली. बलात्कार करणारा हिरो असल्यासारखे पुन्हा पुन्हा दाखविले जाते. सरपंच उपसरपंच नगरसेवक गावातील कामांचा शुभारंभ . अपहरण. खून. या आणि अश्या सर्व बातम्या वृतमानपत्राचया पहिल्या पानावर छापल्या जातात.
शेतकरी आत्महत्या. अवेळी अवकाळी पाऊस पिकांचे नुकसान. बांधकाम कामगार यांचे यांचें विविध प्रश्न. शाळाची फिचया नावाखाली लुट. रेशन घोटाळा. महसूल घोटाळा. भरती घोटाळा. वनविभाग घोटाळा. एजंट दलाल यांचा सुळसुळाट. महागाई. बेरोजगारी. नगरसेवक यांचे बोगस काम. नेत्यांच्या भुखंड घोटाळा. घरकुल भ्रष्टाचार. लाचखोरी. हरवलेले. मयत व्यक्तीची. अश्या अनेक बातम्या बारीक अक्षरांत छापल्या जातात तयाही मागच्या पानावर.
मोठ्या नेत्यांच्या, तसेच साहित्यिकांच्या सभा-समारंभांना स्वतः उपस्थित राहूनच त्यांची हरहुजेरी करुन वार्तांकन करायला हवे. त्याचबरोबर वक्त्यांच्या बोलण्यामागे नक्की हेतू कोणता, हेही त्यांच्या देहबोलीतून, आवाजातील चढ- उतारावरून लक्षात येऊ शकते. अनेकवेळा ही मंडळी एखाद्या महत्त्वाच्या विषयावर थेट मतप्रदर्शन न करता मिश्कीलपणे किंवा उपरोधिकपणे टिप्पणी करीत असतात. त्यावेळी त्यांच्या चेह-यावरील हावभाव, हातवारे बरेच काही बोलून जात असतात. त्यावरून त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळणे सोपे जाते.बातमी तेलमीठ लावून दाखविली जाते. मुळ उद्देश बाजूला राहतो आणि फाफट पसारा दाखविला जातो.
अनेकवेळा लोक आपल्याकडे विविध मागण्यांची पत्रके घेऊन येतात, त्यात त्यांनी त्यांच्या हितसंबंधाचीच कैफियत मांडलेली असते. मात्र अनेकवेळा ती मागणी किंवा तक्रारीच्या खोलात आपण गेलोत तर ती समाजातील मोठ्या गटाशी निगडीत असल्याचे निदर्शनास येते व ती बातमी तालुका, जिल्हा किंवा राज्यस्तरावरील होऊ शकते. पण अशी कोणतीही बातमी वार्ताहर लावत नाहीत कारण या गोरगरीब लोकांच्या कडून काही पैसे मिळत नाहीत.महजे सर्व बातम्या पैशाचा खेळ आहे . त्यामुळे पत्रकातही बातमी दडलेली असते म्हटले जाते.
राजकारणी, भांडवलदार, बिल्डर, ठेकेदार यांच्या साखळी वर्चस्वाला ज्यांच्यापासून वेगवेगळ्या पातळ्यांवरील धोके संभवतात, त्यात त्यांच्या दृष्टीने पत्रकार हे सर्वात तापदायक आहेत. अगदी तालुक्यापासून राजधानीपर्यंत ही हितसंबंधांची साखळी विस्तारली आहे. सगळ्यांना ठाऊक असलेले सत्य हे आहे की पत्रकारांवरील जवळजवळ सर्व हल्ले काही पत्रकार यांना जाळून मारणें. दिवसाढवळ्या गोळया घालणे. ढांबून ठेवणे. धमकी देणे. दम देणें. राजकीय कार्यकर्त्यांकडूनच केले जातात. तरिही पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम असेल जेवण गिफ्ट असल्यास वार्ताहर त्या राजकारणी लोकांच्या कडे वार्ताहर जाताना दिसतात. गोरगरीब लोकांच्या वर होणारे अन्याय याबाबत आवाज उठवणे त्यांच्या अन्यायाविरोधात. अत्याचार विरोधी आपले लेखणी सारखें हत्यार वापरायला या पत्रकार लोकांचे हात पाय कापतात. ते कधी उघड दिसतात, कधी लपून राहतात. सगळ्या रंगांचे पुढारी पत्रकारांना चेपू पाहतात. कारण त्यांचे वाढलेले बळ. पत्रकारांच्या संरक्षणासंदर्भातील कायद्याचा मसुदा अधिकाधिक निर्दोष असावा ही सरकारची जबाबदारी आहे. मंत्रिमंडळ समितीने आपली बुद्धी त्यासाठी खर्च केली तर वृत्तपत्र स्वातंत्र्य बळकट केल्याचे श्रेय त्यांना मिळेल. त्यांच्यासाठी काही सूचना करता येतील. सध्या विचाराधीन मसुद्यात श्रमिक पत्रकार कायद्यातील व्याख्या प्रमाण मानली आहे असे ऐकले. यामुळे मराठी वृत्तपत्रांचे जवळजवळ सर्व ग्रामीण वार्ताहर कायद्याच्या संरक्षणाला मुकतील. खेड्यापाड्यातील बहुतेक वार्ताहर अवैतनिक काम करतात, बातमीदारी हा त्यांच्या उपजीविकेचा व्यवसाय नव्हे. तरीही संरक्षणाची सर्वाधिक गरज खेड्यांमध्ये आहे. काही देशांनी बातमीचे मूळ म्हणजे खबऱ्याचे नाव गुप्त ठेवण्याबाबत पत्रकार रक्षण कायदे केले. त्यांचे अर्थ लावताना, पत्रकार म्हणजे लोकांना माहिती आणि विचार देण्याचे काम करतात ते, अशी सत्याच्या बरीच जवळ जाणारी व्याख्या केली गेली. मात्र हे काम केवळ वृत्तपत्रे चालवणारेच करतात असे नव्हे. पत्रकारांच्या संघटनांच्या आग्रहाने इतर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया म्हणजे रेडिओ व टेलिव्हिजन यात काम करणाऱ्यांनाही मसुद्यात सामावून घेण्यास सरकार तयार झाले हे योग्यच. परंतु ही दुरुस्तीसुद्धा तुटपुंजीच म्हणायची. माहिती आणि विचार देणारी माध्यमे म्हणून यात डीव्हीडी का नको? इंटरनेटमधील संकेतस्थळे, ब्लॉग यांना तरी का वगळावे? आणि ग्रंथ जे आपले आद्य गुरूच म्हणतो, त्यांच्या कर्त्यांना पूर्ण विसरून जाणार की काय?
मी अहमद मुंडे सर्व बांधकाम. रुग्ण. रेशन. माहिती अधिकार. मौलाना आझाद अल्पसंख्याक मंडळ. या संदर्भात आजपर्यंत चार हजार लेख लिहिले आहेत पण आजपर्यंत सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यातील कोणत्याही वृतमानपत्र किंवा युटुब चॅनल यांनी एकही लेख प्रसारीत केला नाही. दिपक पटेकर. परवेझ अशरफी. सागर यातडे. लोकसंपादक कराड. मराठा विदर्भ. मुंबई रिपोर्ट. यामध्येच माझं लेख प्रसारीत झाले आहेत. पण आमच्याच जिल्ह्यातील पत्रकार यांच्या लेखणीला गंज लागला आहे कारणं लेखक साधा आहे आणि पैसा किंवा वर्षाचे पॅकेज देवू शकत नाही यामुळे बातमी लावली जात नाही.हे सर्वजण पत्रकार महणयास योग्य आहेत का?? पैसे घेऊन पत्रकार यांचे आयकार्ड देणारे खरोखरच वार्ताहर आहेत कां??
वार्ताहर यांच्यासाठी पोलिस संरक्षण. वार्ताहर यांना टोल माफी. पेन्शन योजना. पत्रकार परिषद. पत्रकार पुरस्कार. अशा विविध योजना या लेखणी धारकांना सरकारने दिल्या आहेत.पण त्याचा वापर खरोखरच पत्रकार असणारे करत आहेत कां?? फक्त आणि फक्त पैसा मिळविणे एखाद्या व्यक्तीला ब्लँक मेल करणं यासाठी लेखणीचा वापर होतोय कां?? एक नाही अनेक प्रश्न आज सर्वांच्या पुढे आ वासून उभे आहेत.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे 9890825859