You are currently viewing नुकसानग्रस्त भातशेती आणि बागायतीचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू…

नुकसानग्रस्त भातशेती आणि बागायतीचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू…

पंचनामे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश

– पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी
परतीच्या पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेती आणि बागायतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून, आज शेतकऱ्यांच्या बांधावर जात जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली आहे. यावेळी झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती आज पालकमंत्री उदय सामंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी भातशेती, बागायती यांचे पंचनामे करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत. अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. तसेच हे पंचनामे करताना जे अधिकारी पंचनामे करताना टाळाटाळ करत आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून आज एकावर कारवाई देखील केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

तसेच मागील वर्षी नुकसान झालेल्या काहीच भागात नुकसान भरपाई मिळाली नसून ती नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची कारवाई केली जाईल असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.तसेच येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर येणार असून यावेळी ते विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची पाहणी करणार आहेत. येत्या दोन दिवसांत त्याची तारीख देखील जाहीर केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा