You are currently viewing महाराष्ट्र राज्यातील ५ कोटी ६५ लाख जनतेला गरीब कल्याणकारी योजनांचा लाभ

महाराष्ट्र राज्यातील ५ कोटी ६५ लाख जनतेला गरीब कल्याणकारी योजनांचा लाभ

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रतिपादन

 

ओरोस :

 

देशातील सर्वसामान्य जनतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजना राबविल्या व त्या जनतेला सुखकर ठरल्या आहेत. या योजना ग्रामिण भागातील जनतेपर्यन्त पोहचविल्या असून या सर्वच योजनांचा निधी त्या त्या लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करुन सर्व योजना जनतेच्या विश्वासास पात्र ठरवील्या आहेत. राज्यातील १३ कोटी लोकसंख्ये पैकी ५ कोटी ६५ लाख जनतेला गरिब कल्याणकारी योजनांचा लाभ मिळाला आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वाचे यश आहे. असे गौरवोद्गार महाराष्ट्र प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले.

सिंधुनगरी येथील माध्यमिक पतपेढी सभागृहात धन्यवाद मोदीजी अभियानाचा हा कार्यक्रम झाला. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सरचिटणिस प्रभाकर सावंत, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, युवराज लखमराजे दादा साईल आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते, सरकारी योजनेचे अनेक लाभार्थी उपस्थित होते.

कोरोना काळात झालेले लसिकरण व केंद्र सरकारने या साथीत केलेल्या कामाबद्दल माजी पंचायत समिती सदस्या व या भागातील धडाडीच्या महिला नेत्या सुप्रियाताई वालावलकर यांनी आपल्या मनोगतात सरकारच्या कामाबाबत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात राबविलेल्या लसीकरणाबाबत गौरवोद्गार काडले. नागरीकांना सरकारच्या या योजनांमुळे शुध्द पाणी, गँस, अशा गरजेच्या सेवांचा लाभ मिळाला.

अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी स्वप्नाली गोसावी, किसान सन्मान योजनेचे लाभार्थी अनुजा नेरुरकर, उज्वला योजनाच्या लाभार्थी स्वरा गावडे, जलजिवन मिशन बद्दल दिलिप तवटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्वसामान्य लोकांसाठी दिलेल्या योजनांबद्दल कौतूक करीत त्यांना धन्यवाद व्यक्त केले. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सिडको लगतच्या वसंत स्मृती ट्रस्टच्या वास्तू मधील भाजप संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. भाजपचे जिल्हा सरचिटणिस प्रभाकर सावंत यांनी यांनी धन्यवाद मोदी अभीयानाचा उपक्रम व सिंधुदुर्ग जिल्हात केंद्र सरकारच्या राबविल्या गेलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा