सावंतवाडी
येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शालेय क्रीडा स्पर्धांतील विविध क्रीडा प्रकारांमध्ये घवघवीत यश संपादन केले.
रायफल शूटिंग (ओपन साईट) प्रकारात सतरा वर्ष वयोगटाची प्राजक्ता विनोद जाधव (इयत्ता-१०वी) हिने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला व विभागस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली. रायफल शूटिंग (पीप साईट एअर रायफल) प्रकारात १७ वर्षे वयोगटाची नेहा संजय बागल (इयत्ता-१०वी) हिने जिल्हास्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून विभागस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली. रायफल शूटिंग (पिस्तूल) प्रकारामध्ये अथर्व संजय बागल (इयत्ता-७ वी) याचा जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला व विभागस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. शालेय बुद्धिबळ स्पर्धेत साक्षी रमेश रामदुरकर (इयत्ता सहावी) ही जिल्हास्तरावर विजयी होऊन विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. वरद प्रसाद कामत (इयत्ता आठवी) हिची तालुकास्तरीय स्पर्धेत विजयी होऊन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत १४ वर्षे वयोगटामधून २६ ते ३० किलो वजनी गटामध्ये सना सुशांत कामत (इयत्ता सातवी) हिचा प्रथम क्रमांक येऊन तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. १४ वर्षे वयोगटातून ३० ते ३४ किलो वजनी गटामध्ये साची सुशांत कामत (इयत्ता सातवी) हिचा द्वितीय क्रमांक आला. यशराज ढवळ (इयत्ता सातवी) याचा जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत तृतीय क्रमांक आला. जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत २३ किलो वजनी गटात अदिती नारायण सावंत (इयत्ता सहावी) हिचा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक व विभागस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक नारायण शंकर केसरकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यालयीन कामकाजासाठी प्रशालेचे शिक्षक श्री पी बी बागुल, गझल शेख मॅडम तसेच वर्षा बल्लाळ मॅडम यांची विशेष मदत लाभली. या सर्व स्पर्धांसाठी प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग या सर्वांची मदत होत आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री शैलेश पई, सचिव डॉक्टर श्री प्रसाद नार्वेकर, सर्व संचालक मंडळ, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर, मुख्याध्यापक श्री एम पी मानकर, सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांचे कडून करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. क्रीडा तपस्वी कै.शिवाजीराव भिसे सरांनी घालून दिलेला क्रीडा स्पर्धेतील विजयाचा यशस्वी वारसा कळसुलकरच्या विद्यार्थ्यांनी पुढे चालविला आहे याबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.