परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची काँग्रेस प्रवक्ते ॲड. धनंजय जुन्नरकर ह्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्याकडे मागणी !
मुंबई प्रतिनिधी
विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमाच्या (Mumbai University Law Courses) सत्र परीक्षा 3 दिवसावर आल्या असताना, अद्यापही विद्यार्थ्यांचे अर्ज भरलेले नाहीत. त्यामुळे परीक्षेपूर्वी प्रवेशपत्र मिळणार की नाही, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. तसेच २९ नोव्हेंबरला नियोजित असलेली परीक्षा होणार आपल्याला देता येईल किंवा नाही असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.
विद्यापीठाकडून विधी अभ्यासक्रमाच्या पाचव्या आणि सहाव्या सत्राची परीक्षा घेतली जाते. त्यासाठी परीक्षेपूर्वी विद्यापीठाकडे अर्ज दाखल करणे आवश्यक असते. मात्र, काही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात अडचण येत आहे.
विद्यापीठाचा नियोजित सर्व्हर नेहमी डाऊन असतो.
त्यामुळे वारंवार प्रयत्न करूनही परीक्षेचे अर्ज अजून भरून झालेले नाहीत. त्यामुळे प्रवेशपत्र मिळण्याबाबत गोंधळ आहे, असे विधी अभ्यासक्रमाच्या असंख्य विद्यार्थ्याची काँग्रेस कार्यालयात तक्रार आहे.
विद्यापीठाकडून कोणतीही तांत्रिक अडचण नाही. जी काही तांत्रिक अडचण आहे, ती महाविद्यालयांकडून आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे जावे. महाविद्यालय त्यांच्या तांत्रिक अडचणी दूर करतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळतील, असे नेहमीचे गुळमुळीत उत्तर विद्यापीठाने देते आहे.
विधी विभागाच्या अंतीम वर्षाच्या (2022 जून) परीक्षा झाल्या त्यांच्या निकालपत्रात पी आर एन नंबर चा घोळ करून ठेवला आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या गुणपत्रिका निरुपयोगी ठरलेल्या आहेत.
सदर परीक्षेचे पुनरमूल्यांकन अर्ज 5 महिने झाले तरी पडून आहेत.
विद्यार्थ्यांना एल एल एम ला प्रवेश घ्यायला, नोकरी साठी सतत विचारणा होत असून मुंबई विद्यापीठ अधिकारी मात्र आरामात बसून आहेत.
दरवर्षी हेच गोंधळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्वरित हकालपट्टी करून चांगल्या अधिकाऱ्यांना तेथे आणण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते ॲड. धनंजय जुन्नरकर ह्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्याकडे केली आहे.
येत्या 2 दिवसात सदर प्रश्न न सुटल्यास काँग्रेस पक्ष आंदोलन करेल असेही ते म्हणाले.