You are currently viewing भारतीय जनता पार्टी वेंगुर्लाच्या वतीने तालुका कार्यालयात संविधान दिनानिमित्त संविधानाचे पुजन

भारतीय जनता पार्टी वेंगुर्लाच्या वतीने तालुका कार्यालयात संविधान दिनानिमित्त संविधानाचे पुजन

 

महाराष्ट्रात 26 नोव्हेंबर 2022 संविधान दिवस ते 6 डिसेंबर 2022 डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस या काळात जिल्हा व मंडळ स्थरावर साजरा करत आहोत. या अनुषंगाने आज दिनांक 26/11/22 रोजी भारतीय जनता पार्टी च्या तालुका कार्यालयात आज संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संविधानाचे पुजन करण्यात आले. तसेच ‘*आपले संविधान*’ या रमेश पतंगे लिखित पुस्तकाचे प्रकाशन माजी केंद्र प्रमुख श्री. आर. के. जाधव आणि जेष्ठ साहित्यिक श्री अजित वसंत राउळ सर , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री.आत्माराम बागलकर या निवॄत्त शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले. संविधानाबद्दल जनजागृती करण्या साठी हा दिवस साजरा केला जातो. संविधाना मुळे देशाचे ऐक्य व एकात्मता समता टिकुन आहे. भारताचे संविधान बाबासाहेब आंबेडकर यानि लिहिले. भारताचे संविधान जगातील सर्वात मोठे संविधान आहे. 26 नोवेंबर हा संविधान दिवस आहे. भारतीय संविधान धर्म निरपेक्ष वर आधारित आहे. समता, बंधुता, न्याय, समानता लोकरीत, स्वातंत्र्य संविधानाने बहाल केलेले आहे. प्रतेक माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार दिले. बाबासाहेबाना संविधानाचे जनक म्हणतात. असे विचार श्री. आर . के . जाधव यानि मांडले. या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस श्री. प्रसन्ना देसाई, ता. अध्यक्ष श्री. सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष सौ. सुषमा प्रभू खानोलकर, ता.सरचिटनीस श्री प्रशांत प्रभू खानोलकर व श्री. बाबली वायंगणकर, बुथ अध्यक्ष शेखर काणेकर, सौ. व्रुन्दा गवंडळकर, सौ. श्रेया मयेकर, युवा मोर्चाचे दशरथ गडेकर , श्री. वसंत तांडेल, मनवेल फर्नांडीस, श्री. भूषण सारंग, प्रणव वायंगणकर, शशी करंगुटकर इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा