*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री रेखा तांबे लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*वृत्त – आनंदकंद*
विश्वासले जिथे मी, ते लोकही पलटले
जन पारखून घेणे, या जीवनी न जमले…..
जाणून वेदनांना, घ्यावे जरा जगाच्या
का वागण्यात कोणी, माणूसकी विसरले……
स्पर्धेमधे जगाच्या, जगण्यास वेळ नाही
जिंकून घ्यायला ती,
सगळे कसे अडकले……
स्वार्थी जगात येथे, नाही कुणी कुणाचा
मदतीस धावणारे, स्वार्थात
दूर सरले
सोडू नकोस आशा, तू चाल ध्येयमार्गी
कष्टामुळे यशाचे,बघ द्वारही उघडले……
©® सौ. रेखा तांबे.
वडोदरा.