You are currently viewing आरवलीच्या श्री देव वेतोबा चरणी जत्रोत्सवानिमित्त हजारो भाविकांची अलोट गर्दी

आरवलीच्या श्री देव वेतोबा चरणी जत्रोत्सवानिमित्त हजारो भाविकांची अलोट गर्दी

वेंगुर्ला

कोकणचा तिरुपती म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील श्री देव वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव काल हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला. रात्रौ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी श्री वेतोबाचे दर्शन घेतले. यावेळी पर्यटनदृष्ट्या आरवली वेतोबा मंदिर व आजूबाजूचा परिसर विकासाकरिता निधी उपलब्ध करुन देण्याचे अभिवचन त्यांनी दिले.

केळ्याच्या घडाची जत्रा म्हणून ओळख असलेल्या श्रीदेवी वेतोबाच्या जत्रोत्सवास महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यातील हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून केळ्याच्या घडांचा नवास फेडतात. केळ्याच्या घडाप्रमाणे चप्पल जोड देण्याची ही प्रथा आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही मध्यरात्रीनंतर २ वाजता जत्रोत्सवात श्री देव वेतोबाचे दर्शन घेत केळ्याच्या घडाचा नवस फेडला. श्री देव आरवली वेतोबा देवस्थानाचा पर्यटन ‘ब‘ दर्जात समावेश झाल्याचे दीपक केसरकर यांनी जाहीर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले.

रात्रौ श्री देव वेतोबाची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी जत्रोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.

प्रतिक्रिया व्यक्त करा