बांदा
कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग या संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक विविध उपक्रम राबवलेले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एचआयव्ही निर्मूलन व जनजागृती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या MSACS विभाग अंतर्गत कामगार लक्षगट हस्तक्षेप या प्रकल्पातून कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून आज दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी जागतिक काजू दीना निमित्त माडखोल येतील महावीर काजू कंपनी येथे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी ७० कामगारांची रक्त तपासणी करण्यात आली.
यावेळी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने श्री. अजिंक्य शिंदे (प्रोग्रॅम मॅनेजर), श्री. समिर शिर्के (समुपदेशक), सौ. अवंती गवस,प्रथमेश सावंत, श्री.जयराम जाधव श्री. प्रदीप पवार,श्री कुणाल चव्हाण, डॉ श्रीधर मिस्त्री, सावंतवाडी लॅब इंचार्ज अमित लिंगवत, महावीर काजू कंपनी चे व्यवस्थापक नंदू डांगी उपस्थित होते.