कासार्डेचे शामसुंदर राणे व पणदूरचे संजय गावकर यशाचे मानकरी
तळेरे
सांस्कृतिक संसाधन व प्रशिक्षण केंद्र (CCRT) नवीदिल्ली सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार द्वारा देशभरातील निवडक शिक्षकांच्या झालेल्या प्रशिक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन माध्यमिक शिक्षकांनी या राष्ट्रीय प्रशिक्षणात उज्जवल यश संपादन केले आहे.कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक शामसुंदर राणे व पंणदुर हायस्कूल व ज्यु.काॅलेजचे शिक्षक संजय गावकर हे या शिक्षकांचा समावेश आहे.
सांस्कृतिक संसाधन व प्रशिक्षण केंद्र (CCRT) नवी दिल्ली सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार द्वारा
यापुर्वी देशभरातील निवडक शिक्षकांसाठी राजस्थानातील उदयपूर येथील सीसीआरटी सेंटरमध्ये आयोजित करण्यात आले होते, या २२ दिवसाच्या प्रशिक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या दोघांनी सहभाग घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले होते .हे प्रशिक्षण उत्कृष्टरित्या पूर्ण केल्यामुळे सीसीआरटी मार्फत कासार्डे माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री .शामसुंदर वसंत राणे व पणदूर ज्युनिअर काॅलेजचे श्री.संजय दत्तात्रय गावकऱ यांची सन 2020 मध्ये म्हणजे नुकतेच सीसीआरटी नवीदिल्ली मार्फत घेण्यात आलेल्या ई- लर्निंग वर्कशॉप यासंदर्भात घेण्यात आलेल्या ऑनलाईन ट्रेनिंगसाठी निवड झाली होती.या दोघांनी राष्ट्रीयस्तरावरील हे पाच दिवसांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करीत अभिनंदनीय यश संपादन केल्याबद्दल त्यांना दिल्ली सीसीआरटी प्रशिक्षण केंद्राचे संचालक ऋषी कुमार वशिष्ठ यांचेमार्फत प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शामसुंदर राणे यांनी अनेक स्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणूनही उत्तमरीत्या कामगिरी पार पाडली आहे.
शामसुंदर राणे यांच्या या यशाबद्दल कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, मानद सरचिटणीस उपेंद्र पाताडे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, स्कूल कमिटी चेअरमन मधुकर खाड्ये, प्राचार्य आर.व्ही. नारकर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.