You are currently viewing पाऊलखुणा

पाऊलखुणा

*काव्य निनाद साहित्य मंच पुणेच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ कविता वालावलकर लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*पाऊलखुणा*

माझ्या मी पाऊलखुणा
रेतीमध्ये कोरत गेले
निळ्याशार सागराच्या
किनारी भटकत गेले

लाटांचे ते जाणे येणे
किती सुंदर वागणे
किती उंच झेप घेणे
कधी हळुवार पसरणे

शोधू लागले किनारी
ठेवलेल्या पाऊलखुणा
कधी मला न उमजले
क्षणभंगुर ह्या जीवना

जपलेल्या पाऊलखुणात
क्षणात सारे वाहून गेले
नाही काही तुझे माझे
सत्य सार सांगून गेले

सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 4 =