राज्यातील आठ विभागातील ४३ स्पर्धकांचा सहभाग;१६ स्पर्धकांची अंतिम फेरीत निवड
देवगड
श्री स.ह केळकर वरिष्ठ महाविद्यालय, देवगड आणि श्रीमती. न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय देवगड यांच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने गोष्टरंग ही आंतरराज्यस्तरीय मराठी कथाकथन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक ११ व १२नोव्हेंबर २०२२ या दिवशी संपन्न झाली. या स्पर्धमध्ये कोकण, मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, नाशिक या 8 विभागांतील ४३ स्पर्धकांनी सहभाग घेतला. सर्व स्पर्धकांनी उत्कृष्ट दर्जाचे सादरीकरण करून स्पर्धत रंगत निर्माण केली. सर्व स्पर्धकांतून अंतिम फेरीसाठी १६स्पर्धकांची निवड करण्यात आली. अंतिम फेरीची तारीख लवकरच कळविण्यात येईल. प्राथमिक फेरीतील स्पर्धचे परीक्षण लेखक,अभिनेते आणि दिग्दर्शक श्री. प्रदीप तेंडुलकर आणि श्री. चंद्रकांत निकाडे यांनी केलं. स्पर्धेविषयी बोलताना दोन्ही परीक्षकांनी स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन, नियोजन, स्पर्धकांचे चांगले सादरीकरण या बद्दल खूप समाधान व्यक्त केले. पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजित केलेली आणि प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रु.50000, 30000, 15000 इतके मोठे बक्षीस देणारी महाराष्ट्रातील ही एकमेव स्पर्धा असून कथाकथन स्पर्धा लोप पावत असताना देवगड महाविद्यालयाने कथाकथन स्पर्धा आयोजित करून एक वेगळा आदर्श ठेवला आहे असे गौरोद्गार काढले. अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांचे संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच प्राचार्या यांनी अभिनंदन केले आहे व त्यांना अंतिम स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.