*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री हेमांगी देशपांडे लिखीत अप्रतीम लेख*
*श्री.अरविंद घोष यांचा अति मानस योग*
(नुकतीच 15 ऑगस्ट 2022 ला श्री अरविंद घोष यांची दीडशेवी जयंती झाली आहे.)
योग गुरु श्री.अरविंद घोष यांचा जन्म १५ ऑगस्ट१८७२ साली ला बंगालची राजधानी कलकत्ता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव त्रिशन धन होते तर त्यांच्या मातेचे नाव स्वर्णलता होते.त्यांचे वडील म्हणजे त्रिशन धन हे नामांकित सिविल सर्जन होते.
श्री अरविंद घोष यांचे शिक्षण दार्जिलिंग येथील कॉन्व्हेंट मध्ये झाले .पुढे ते केंब्रिज विद्यापीठात शिकायला इंग्लंड येथे गेले.
श्री अरविंद घोषे बालपणीपासूनच कुशाग्र बुद्धीचे होते. पुढे मोठे झाल्यावर त्यांनी आयसीएस ची परीक्षा पास केली.
श्री अरविंद बहुमुखी व्यक्तिमत्त्वाचे धनी होते राजकारण ,दर्शनशास्त्र, योग अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपले योगदान दिले. श्री अरविंद घोष हे स्वतंत्र सेनानी देखील होते.
योग क्षेत्रात त्यांनी आपले बहुमूल्य योगदान दिले. योगशास्त्रला नवीन आयाम दिले. त्यांचा “अति मानस योग” किंवा “समग्र योग” किंवा “सर्वांगीण योग “सर्वज्ञात आहे.
योग म्हणजे काय?
योग म्हणजे मिलन आत्म्याचे परमात्म्याशी , जीवाचे शिवाशी, मानस चा अति मानस शी आत्मसात आपल्या खऱ्या स्वरूपाशी मिलन म्हणजे योग, आनंदा चे परमानंदशी मिलन म्हणजे योग, सामान्य तत्वाचे दैविय तत्त्वांची समागम म्हणजे योग.
या सृष्टीत अनेक प्रकारचे योग आहेत जसे हटयोग ,कर्मयोग भक्तीयोग ,ज्ञानयोग वगैरे.वेद पुराणांच्या मते या योगाच्या सहाय्याने मनुष्य किंवा जड जीव ईश्वरास प्राप्त करू शकतो तर हट योगात मनुष्याला संसाराचा त्याग करावा लागतो तेव्हाच या योगाचा मार्ग खुला होतो.
श्री अरविंद यांचा अति मानस योग म्हणजे काय हे आपण थोडक्यात पाहू.
श्री अरविंद घोष यांच्या मते हे सर्व योग एकांगी योग आहेत. असे असले तरी त्यांचा एकमेकांशी भावात्मक संबंध आहे. जसे योग्य कर्म करण्यासाठी त्याविषयीचे योग्य ज्ञान तुम्हास असणे आवश्यक असते .तुम्हाला मिळणारे ज्ञान हे ज्ञान योगाने मिळते म्हणून उत्तम कर्म करण्यासाठी ,उत्तम कर्मयोगासाठी ज्ञान योगाची आवश्यकता आहे. अशाच प्रकारे हे सर्व योग एकमेकांशी संलग्न आहेत. त्यामुळे हे एकमेकांच्या सहकार्याशिवाय अपूर्ण आहे.
मनुष्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या सर्व योगांच्या शाखांना एकत्रित आणणे गरजेचे आहे. कारण जसे शरीराच्या विकासासाठी केवळ जीवनसत्वेच किंवा केवळ प्रथिनेच किंवा केवळ खनिजेच हेच एकटे शरीराचा संपूर्ण विकास करू शकत नाही. या सर्व तत्त्वांची योग्य प्रमाणात शरीराला आवश्यकता असते तद्वतच मानवाच्या उन्नतीसाठी, आत्मिक विकासासाठी, आर्थिक विकासासाठी , भौतिक विकासासाठी, मानव जात कल्याणासाठी,मानवाच्या उत्थानासाठी या सर्व प्रकारच्या लोकांची गरज असल्यामुळे या सर्व प्रकारच्या योगप्रकारांनी एकत्रित येणे आवश्यक आहे.
म्हणूनच अरविंद घोष यांनी या सर्व योगांच्या एकत्रिकरणातून एक नवीन योग ,एक सर्वांगीण योग ,एक समग्र योग म्हणजेच “अति मानस योग “या नवीनतम योग पद्धतीचा योग निर्माण केला.
कारण मनुष्याला जीवन जगताना अध्यात्मिक ,आत्मिक उन्नती बरोबरच मानसिक प्रगती ,भौतिक प्रगती व सामाजिक प्रगती आणि सुधारणांची आवश्यकता आहे.
या सर्व योगांच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेला हा समग्र योग या सर्व गोष्टींची परिपुर्तता करणार आहे.या योग्याद्वारे मनुष्यास किंवा जीवास त्याला हवी असलेली सर्वांगीण प्रगती होइल आणि त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याला सहज सापडतील, असा अरविंद घोष यांचा विश्वास आहे.
या योगाद्वारे जेव्हा समाजाची आर्थिक प्रगती होईल तेव्हा समाजात गरीब श्रीमंत हा भेद राहणार नाही. आर्थिक परिस्थिती सर्वत्र सारखी झाल्याने परिस्थितीत समन्वय साधला जाईल. श्रीमंत गरिबीचे उच्चाटन करणे हेच या “समग्र योगाचे” प्रमुख ध्येय आहे.
केवळ आर्थिक भेदातूनच नव्हे तर समाजातील उच्च नीच भावनेतून समाजाला मुक्त करणे व त्याचा परमात्म्याशी संबंध जोडणे. मनुष्याचा मनापासून आत्म्यापासून परमेश्वराशी संबंध जोडण्याचा प्रयत्न व मनुष्यातीलभेदभावाचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनीसमग्र योग सांगितला.
ईश्वराची किंवा परमात्म्याची संबंध जोडत असताना भौतिक सुखाची कुठलीही उपेक्षा करायची नाही किंवा संसाराचा कुठल्याही त्याग करायचा नाही. संसाराचा तिरस्कार करायचा नाही.
किंबहुना समाजातील प्रत्येकालासुखी संसार जगण्यासाठी ,भौतिक सुख सुविधा मिळावी , सर्वसाधनांनी युक्त जीवनसमाजाला मिळावे, समाजातील प्रत्येक स्तराला मिळावे अशी त्यांची इच्छा होती.
इतकेच नव्हे तर सर्व मनुष्य एकमेकांशी प्रेमाने वागतील, कोणीही कुणाचा तिरस्कार करणार नाही. म्हणजेच सर्व सुविधांनी युक्त असा समाज आर्थिक समानता व एकमेकांविषयी प्रेम या पृथ्वीवर स्वर्गाच निर्माण करेल. प्रत्येक मनुष्याची एकमेकांविषयीची राग, द्वेषाची भावना संपेल. प्रत्येक व्यक्तीची खलप्रवृत्ती गळून पडेल. व समाजात सदविचारांची सत्कर्मांची वाढ होईल.
“जे खळांची व्यंकटी सांडो
तया सत्कर्मी रती वाढव
भुता परस्परे पडो
मैत्र जीवांचे”
अशा विश्वबंधुत्वाच्या भावनेमुळे ही वसुंधरा स्वर्गाची जणू “नीलचित्रच “ठरेल. म्हणूनच श्री अरविंद घोष म्हणतात.
“संदेश नही मे यहा स्वर्ग लाया हुl
भूतल कोही स्वर्ग बनाने आया हु l
अशी परिस्थिती भूतलावर निर्माण होईल ती केवळ आणि केवळ समग्र योगानेच अशा श्री अरविंद घोष यांचा विश्वास आहे.
आठवणी परमात्म्याचा अद्वैतवाद त्यांनी स्वीकारला.ही सारी सृष्टी म्हणजेच परमात्म्याची विविध रूपात झालेली अभिव्यक्ती आहे व प्रत्येक जीव हा परमात्म्याचा अंश आहे. जे दैवीय तत्व परमात्मा मध्ये आहे तेच दैवीय तत्व प्रत्येक मनुष्यातही आहे.म्हणजेच
“जे पिंडी तेच ब्रम्हांडी”.
अर्थात मानव व ईश्वर एक तत्त्वच आहे.
अशा या संबंधाची जेव्हा मानवाला जाणीव होते. तेव्हा त्याला आपल्या दिव्यत्वाची ओढ लागते. व मानवाची सच्चिद नंदाशी म्हणजेच सचित आनंदाची ओळख होते.
अरविंद घोष यांच्या मते, परम तत्त्व हे उच्च स्तर आहे तर जड तत्त्व हे निम्नस्तर आहे. परम तत्त्वाचा जड तत्त्वाकडे झालेला प्रवास म्हणजे “प्रतिविकास “तर जड तत्त्वाचा परंतु झालेला प्रवास म्हणजे” विकास”. प्रत्येक जीव जडतत्त्व उच्च स्तरास कडे जाण्यासाठी धडपडत असतो.
जड ,भूत ,प्राण ,मन ,मानस, अति मानस या सहा पायऱ्यांचा प्रवास करून जड तत्त्व परंतु जाऊ शकतो. ही पायरी चढण्याची साधना सोपी नाही. त्याचा वेग खूप मंद असतो. याची गती जलद व्हावी अगदी या जन्मात च व्हावी यासाठी समग्र योग साधता येणे आवश्यक आहे. मनुष्य मानस या पायरी पर्यंत पोहोचला आहे पण अति मानस (सुपर माईंड)या पायरी पर्यंत अजून पोहोचलेला नाही. मात्र समग्र योगाच्या सहाय्याने मनुष्य हा विकास ही पायरी गाठू शकतो .
त्यासाठी त्याला काही प्रक्रियेतून जावे लागते. त्याचे मन भौतिकतेतून निघून त्याचा आंतरिकप्रवास सुरू होणे आवश्यक आहे. त्याला ईश्वराची अध्यात्माची गोडी लागणं गरजेचे आहे. मानस मधून अति मानस स अवस्थेत मनुष्य गेला की त्याचा परमात्म्याची संबंध जुळेल. मनुष्य व परमात्मा याचा भेदाभेद संपेल. ईश्वर व मनुष्य या एकत्वाची जाणीव मनुष्यास होईल.
श्री अरविंद घोषाच्या अति मानस योग्याद्वारे माणूस अंधकाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल सुरू करेल. प्रत्येक व्यक्तीकडून निस्वार्थ ,निष्काम कर्म केल्या जाईल.
“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशू कदाचन”
युक्तीनुसार मानव आपले कर्म करून कर्मयोग साधू शकेल. आपला व प्रकार हा भेद मिटून सर्व मानव जनकल्याणासाठी एकजूट होऊन कार्य करेल. यानेच विश्वबंधुत्वाची भावना निर्माण होऊन “वसुधैव कुटुंबकम “ही संकल्पना प्रत्यक्षात येईल.
समग्र योग हा इतर योगा प्रमाणे कालांतरीत व कालजयी योग आहे.याने विश्व कल्याण मानव कल्याण समाज कल्याण साधले जाईल व मानवाच्या विकासाला उत्तुंग शिखर प्राप्त करून देईल यात शंका नाही.
सौ हेमांगी देशपांडे
नागपुर