ओरोस:
पतंजली योग समिती सिंधुदुर्ग आणि छत्रपती शिवाजी महाराज कृषी महाविद्यालय ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस शहरामध्ये आज पतंजली योग वर्ग चालू करण्यात आला. या वर्गाचे उद्घाटन ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि अध्यक्ष म्हणून कृषी महाविद्यालयाचे प्रो. आनंद सावंत होते यावेळी पतंजली योग समिती उपजिल्हा प्रभारी शेखर बांदेकर , पतंजली योगसमिती जिल्हा प्रभारी तुळशीराम रावराणे ,युवा जिल्हा प्रभारी आनंद परब ,प्रो. विवेक राणे, सैनिक फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष परब, कणकवली तालुका प्रभारी प्रकाश कोचरेकर आदी उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले पहिल्याच दिवशी योग वर्गामध्ये लक्षणीय उपस्थिती होती.
सर्वसाधारकांनी सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, प्राणायाम असा अभ्यास केला उद्यापासून योग वर्ग सकाळी ५.३० ते ७ या वेळेस दररोज सुरू राहील. कर्नल सुधीर सावंत यांनी रोगमुक्त होऊन रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ओरोस मधील सर्व नागरिकांनी या योग वर्गाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.