डिझिटल शाळा नंतर आमदार राणे यांचा नवा उपक्रम
कणकवली विधानसभा मतदार संघातील शाळांमध्ये अखंडीत विज रहावी,तसेच त्या ठिकाणी शिक्षण घेणार्या मुलांना त्याचा फायदा व्हावा, यासाठी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली विधानसभा मतदार संघातील शाळांवर “सोलर पॅनल” बसविण्यात येणार आहे. हा संकल्प त्यांनी आज केला आहे.तसे त्यांनी आज आपल्या ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले आहे.
दरम्यान त्यांच्या या निर्णयामुळे शाळांना मोठ्या प्रमाणात येणारी विजेची बिले कमी होण्यास मदत होणार आहे. त्याच बरोबर अखंडीत विज मिळाल्यामुळे त्याचा फायदा विद्यार्थ्याना होणार आहे. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
आमदार नितेश राणे यांनीं या पूर्वी मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या दोनशे शाळा डिझिटल करून राज्यात विक्रम केला होता.सध्यस्थीतीत विजेचे वाढलेले दर आणि येणारी भरमसाठ विजबिले यावर सैर ऊर्जेचा पर्याय महत्वाचा ठरणार आहे.