You are currently viewing मॉडेल कॉलेज, विद्यापीठ उपपरिसरात सुविधा उपलब्ध करा

मॉडेल कॉलेज, विद्यापीठ उपपरिसरात सुविधा उपलब्ध करा

तोपर्यंत दोन्ही परिसर बंद ठेवा; मनसेकडून कुलगुरूंना निवेदन सादर

सावंतवाडी

सिंधुदुर्गात मुंबई विद्यापीठकडून सुरू करण्यात आलेले तालुक्यातील एका मॉडेल कॉलेज, तसेच सावंतवाडी येथील एका विद्यापीठाचा उप परिसर याबाबत विद्यापीठाकडून अनास्था दिसून येत आहे. येथील कामकाज पाहण्यासाठी तसेच स्वच्छता करण्यासाठी अद्याप एकही कर्मचारी नियुक्त केला नसल्याने येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच इथे पसरलेल्या अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. इथे योग्य ती सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईपर्यंत येथील दोन्ही परिसर बंद ठेवावेत अन्यथा मनसे बंद करेल, असा इशारा मनसेच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना देण्यात आला आहे.

यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर उपशहर अध्यक्ष प्रवीण गवस सचिव कौस्तुभ नाईक आकाश परब मनोज कांबळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा