You are currently viewing दिंव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचे भाजपा दिंव्यांग विकास आघाडी सिंधुदुर्गच्या वतीने आभार

दिंव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारचे भाजपा दिंव्यांग विकास आघाडी सिंधुदुर्गच्या वतीने आभार

 

भाजपा दिंव्यांग विकास आघाडी – सिंधुदुर्ग च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच आम.बच्चु कडु यांनी दिंव्यांगांसाठी स्वतंत्र दिंव्यांग कल्याण विभाग निर्माण करणार असल्याचे घोषित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच शिंदे – फडणवीस सरकार हे दिंव्यांगांच्या भावनांचा आदर करणारे सरकार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे दिंव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी केले.

दिंव्यांगाप्रती शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी व आभार व्यक्त करण्यासाठी भाजपा दिंव्यांग विकास आघाडीची जिल्हा पदाधिकारी बैठक कसाल येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी शिंदे – फडणवीस सरकारने गाव – खेड्यातील दिंव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये दिंव्यांग भवन तथा जिल्हा दिंव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच दिंव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम ही कमी असुन ती मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणारया शिष्यवृत्ती इतकी देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच अकोला व ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर घरोघरी जाऊन दिंव्यांगांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच खासगी क्षेत्रामध्ये दिंव्यांगांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी सरकारने समीती नियुक्त केल्याचे सांगितले.

यावेळी दिंव्यांग आघाडीचे जिल्हा सरचिटणीस शामसुंदर लोट, स्वाती राऊळ, दिक्षा तेली, चव्हाण मॅडम, सुनील तांबे, प्रकाश वाघ, प्रकाश सावंत, प्रशांत कदम, विठ्ठल शिंगाडे, निलम राणे, मठकर इत्यादी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा