कणकवली :
कणकवली येथे २० नोव्हेंबर रोजी तालुका सांप्रदायिक भजनी संस्था कणकवली आयोजित अभंगवाणी कार्यक्रमाचे उद्घाटन युवा नेते श्री. विशाल परब यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री.विश्वास प्रभुदेसाई, बुवा श्री. प्रकाश पारकर, श्री.सुदर्शन फोपे, श्री. पंढरीनाथ जाधव तसेच संस्थेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी संगीत क्षेत्रातील युवक-युवतींना संबोधित करताना श्री.विशाल परब म्हणाले की भजन क्षेत्राचा समाज प्रबोधन करण्यात जो मोठा वाटा आहे. त्याची तुलना आपण कशाचीच करू शकत नाही. त्यामुळे जे तुम्ही कार्य करताय ते ईश्वर कार्य आहे, तुम्हाला नेहमी मदत हि विशाल सेवा फाउंडेशन करत राहील. या कार्यक्रमात सिंधुदूर्ग मधील विविध ३२ बुवा चा सत्कार करण्यात आला.