जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू…
सिंधुदुर्गनगरी :
नाविन्यपूर्ण योजना राबविल्या नाहीत, ज्या राबविल्या त्यामध्ये कोटींचा भ्रष्टाचार, आरोंदा गावच्या सहकारी सोसायटी ने मयत लाभार्थी च्या नावावर रेशनिंग धान्य घोटाळा याबाबत आज ओरोस फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बेमुदत घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
यावेळी रावजी गंगाराम यादव, सुर्यकांत विठ्ठल नाईक, दिलीप यशवंत नाईक, देवदत्त गुरुनाथ पडते,अरुण अनाजी नाईक, काशिनाथ लाडू कदम, सहदेव झिलू पाटकर, रविकांत जाधव, तुषार जाधव, पंढरी पांगम आदी उपस्थित होते.