*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी,मुंबई लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*पुरूष तुम्ही*
तुमच्या आधी उठले मी
अन केले केर वारे
भाजी पोळी डब्यासाठी
दूध चहा कॉफी सारे
रात्रीपासूनची पडलेली भांडी
घासली मी खसाखसा
वॉशिंग मशीन लावून झाली
तुम्ही आराम करा खासा
साफसफाई नि आवरले घर
स्वीपिंग डस्टिंग माॅपिंग
लंच बाहेरूनच मागवला
दुपारनंतर केली शॉपिंग
डिनर साठी बाहेरच गेलो
स्वयंपाकाला आज दांडी
थकून भागून उशिरा आलो
आज नको भांडीकुंडी
तोरा तुमचा पुरे करा
अंथरूण घाला लगबगा
डोळे मोठे काय करताय
घड्याळात किती वाजले बघा
बारा वाजून गेले आता
झटका तुमचा आळस
नेहमीप्रमाणे कामाला लागा
संपला जागतिक पुरुष दिवस
— हेमंत कुलकर्णी
मुलुंड, मुंबई