You are currently viewing कणकवली शहरातील 472 कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया

कणकवली शहरातील 472 कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली माहिती

कणकवली

कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहिमे कणकवली नगरपंचायत मार्फत गेले काही दिवस सुरू आहे.या भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या मोहिमेत आतापर्यंत 472 भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

गेले काही महिने सातत्याने ही मोहीम राबवण्यात आली होती. कणकवली शहरात अजून सुमारे ९० ते १०० पर्यंत कुत्रे निर्बीजीकरणाच्या मोहिमेपासून शिल्लक राहिले आहेत. तज्ञांच्या सल्ल्यानुसार काही कारणांमुळे हे कुत्रे निर्बीजीकरण करण्यात आले नाहीत. अशी माहिती समीर नलावडे यांनी दिली. कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून व्होट्स फॉर ॲनिमल या संस्थेमार्फत दोन टप्प्यात ही मोहीम राबवण्यात आली होती. कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून यापूर्वी ही मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र मध्यंतरी ही मोहीम स्थगित करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात राबवलेल्या मोहिमेमध्ये 182 कुत्रे पकडण्यात आले. शिल्लक राहिलेल्या 90 ते 100 कुत्र्यांना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार निर्बीजीकरण करण्यात येणार असल्याची माहिती समीर नलावडे यांनी दिली

प्रतिक्रिया व्यक्त करा