You are currently viewing छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेतील बालकलाकार एक दिवस छोट्यांसाठी, खाऊ गल्ली उपक्रमात उपस्थिती..

छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेतील बालकलाकार एक दिवस छोट्यांसाठी, खाऊ गल्ली उपक्रमात उपस्थिती..

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार उपक्रमाचे उद्घाटन..

 

कणकवली :

 

कणकवलीत उद्या २० नोव्हेंबर रोजी चौंडेश्वरी मंदिरानजीक गणपती साना येथे छोट्या मुलांसाठी एक दिवस छोट्यांसाठी, खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सायंकाळी  ५.०० वाजता या उपक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी खास आकर्षण म्हणून सोनी मराठी वाहिनीवरील छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेतील सर्व बालकलाकार याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. एक दिवस छोट्यांसाठी कार्यक्रमात या बालकलाकरांसोबत छोट्यांना मजा मस्ती करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. छोट्या बयोची मोठी गोष्ट या मालिकेतील वीणा जामकर-भारती, विक्रम गायकवाड – शुभंकर, रुची नेरुरकर- बयो, अनुष्का पोकळे – इरा, शौरीन देसाई- आरव, रिद्धी कदम-गुड्डी, चिन्मया ठाकूर – चैतन्या हे बालकलाकार याप्रसंगी या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. या सोबतच मुंबई येथील गायक सौरभ दफ्तरदार, तृप्ती दामले यांची गाण्याच्या मैफिलचा नजराणा पेश केला जाणार आहे. कॉमेडी कम अँकर विजय नायर हे देखील या निमित्ताने उपस्थित असणार आहेत. बोलक्या बाहुल्या व जादूगार लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवणाऱ्या सुचित्रा कुमार यांचे देखील जादूचे प्रयोग व बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम होणार आहे. लहान मुलांना आकर्षण असणारे वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून या ठिकाणी असणार आहेत. या ठिकाणी सेल्फी पॉईंट देखील केला जाणार आहे. लहान मुलांना मज्जा मस्ती करता यावी. थोडा विरंगुळा मिळावा या उद्देशाने खाऊ गल्ली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खाऊ गल्लीमध्ये येणाऱ्या सर्व मुलांना खाऊ साठी ५० रुपयांचे कुपन दिले जाणार आहे. तसेच या वेळी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल मोफत लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सेल्फी पॉईंट, झोपाळे, पाळणी, अनेक खेळणी देखील या ठिकाणी असणार आहेत. स्थानिकांना, बचत गटांना स्टॉल साठी प्राधान्य देण्यात येणार देणार आहे. या खाऊ गल्ली मध्ये पिझ्झा, पाणीपुरी, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, शोरमा, चायनीज असे अनेक स्टॉल असणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री नलावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा