मालवण
आदर्श व्यापारी संघटना आचरा तर्फे मंगळवार दि. २२ नोव्हेंबर रोजी वार्षिक सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दुपारी महाप्रसाद, सायंकाळी स्थानिक भजने तर रात्रौ ठिक ९.३० वाजता भव्य जिल्हास्तरीय गृपडान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक १५ हजार ,द्वितीय पारितोषिक १० हजार, तृतीय ७ हजार तसेच तीनही क्रमांकाना शिवरामेश्वर ट्रॅव्हल्स गिरीश बाणे, उमेश बाणे यांच्यातर्फे आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या १२ संघांना प्रवेश दिला जाणार आहे. अधिक माहिती साठी अर्जुन बापर्डेकर 9420082320, 8766439288, विजय कदम -9421037712 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आदर्श व्यापारी संघटना आचरा तर्फे करण्यात आले आहे.




