You are currently viewing “मिशन सिंड्रेला” युवा फोरम भारत संघटनेचा स्तुत्य उपक्रम…

“मिशन सिंड्रेला” युवा फोरम भारत संघटनेचा स्तुत्य उपक्रम…

खास करून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक समस्यावर केलं मार्गदर्शन…

कुडाळ :

युवा फोरम भारत संघटना पुन्हा एकदा समाजकार्यासाठी पुढे आली आहे. आपली समाजाप्रती कर्तव्यदक्ष असणारी भूमिका ते कायम बजावत आलेले आहेत आणि बजावत आहेत. आणि ह्या वेळेला सुद्धा त्यांनी अशाच एका खूप दुर्लक्षित झालेल्या विषयाला वाचा फोडण्याचे काम केले आहे. आणि ते म्हणजे “menstrual hygene”(मासिक पाळी )
युवा फोरम, भारत संघटना सद्ध्या mission cinderella ( मिशन सिंड्रेला) नामक एक उपक्रम राबवत आहे. खास महिलांच्या अरोग्यच्या दृष्टीने, काही समस्या समाजात जाणवत आहेत आणि त्यावर लक्ष केंद्रित करून युवा फोरम, भारत संघटना कार्यरत आहे. आणि म्हणूनच रविवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२० रोजी संघटनेने आपल्या काही सहकार्यांना घेऊन सेवांण ,कट्टा येथे काही महिलांसोबत ह्या विषयाला घेऊन संवाद साधला. कट्टा, नांदोस, पेंडुर व इतर ठिकाणाहून बायकांनी आपली उपस्थिती दर्शवली. केवळ तरुण मुलीच न्हवे तर अनेक वयस्कर महिलानी उपस्थिति दर्शवलि व मोकळे पणाने संघटनेच्या स्वयंसेविका जिजा निधि जोशी व जिजा दिक्षिता परब ह्यांच्याशी आपल्य समस्यांवर चर्चा केली. कोरोनाचे नियम पाळून हा जागृती कार्यक्रम पार पाडला गेला. त्यांना त्यांच्या *menstrual hygene* चे महत्त्व, ह्या जागृतीचा उद्देश, स्वरूप, आपल्या खाजगी अवयवांची निगा कशी राखावी, काय करू नये काय करायला हवे ह्याचे ज्ञान आणि माहिती ह्या युवा फोरम सदस्यांनी आणि त्याच्या स्वयंसेवकांनी ह्या महिलांना दिली. त्या महिलांसोबत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांना उद्भवणारे प्रश्न आणि त्यांच्या कडे अभाव असलेल्या सुविधा यावर काही ना काहीतरी आणि लवकरच तोडगा काढला जाईल ह्याचे आश्वासन देऊन ह्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. व गरजु महिलांची यदि काढन्यत आली ज्यांना युवा फोरम मार्फत मोफत sanitary नप्किंस प्रति महिना देण्यात येणार आहेत. हा विषय दुर्लक्ष करण्याचा नसून त्याबाबत जागृत होऊन त्याप्रमाणे वागण्याचा विषय आहे. विविध रोग आणि आजार हे ह्याच दुर्लक्षितेमुळे पसरतात ह्याची जाणीव गावातील प्रत्येक महिलेला झाली पाहिजे हे लक्ष ठेऊन मालवण सेवांगण अध्यक्ष, कट्टा आणि बॅरिस्टर नाथ पै संस्था, कट्टा याचे सचिव दीपक भोगटे, सेवांगण कट्टा च्या सर्वे सर्वा सुजाता पावसकर मॅडम यांच्या सहकार्याने युवा फोरम, भारत चे संघटना प्रमुख यशवर्धन राणे, तसेच युवा फोरम कट्टा चे सदस्य दिक्षीता परब, निधी जोशी, अभिषेक पावसकर, रोहन डांटस, तसेच सूरज खरात, हार्दिक कदम आणि आदित्य बटावले यांनी Mission Cinderella उपक्रमाच्या जागृती भेटीला सुरुवात केली.
अशा प्रकारे युवा फोरम, भारत संघटना ह्या आणि अश्या बऱ्याच समस्यांना वाचा फोडून त्यांचे निवारण करण्याच्या तयारीत आहेत. आणि ही एक समाजासाठी आदर्शवत बाब आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा