सिंधुदुर्गनगरी
यूपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रेरणा अंतर्गत मार्गदर्शन करण्यात येत आहे. यावेळी मुळच्या केरळ राज्यातील असणाऱ्या व सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. असलेल्या करिष्मा नायर सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दुपारी १२.०० वाजता फेसबुक लाईव्ह व्दारे मार्गदर्शन करणार आहेत. सोमवारी होणाऱ्या फेसबुक लाईव्ह मार्गदर्शनात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी उपस्थित राहणार आहेत. तरी याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासानाच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रीम. नायर सन २०२० मध्ये युपीएससीच्या ऑल इंडिया रँक १४ व्या क्रमांकाने उर्तीर्ण झाल्या आहेत. त्यांनी हे यश दुसऱ्या प्रयत्नात मिळविले आहे. श्रीम. नायर यांनी पब्लिक ॲडमिनीस्ट्रेशन हा वैकल्पिक विषय घेवून युपीएससीची परिक्षा दिली. सध्या त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. म्हणून कार्यरत आहेत.
यूपीएससी परीक्षेची तयारी कशी करावी, आत्मविश्वासाने मुलाखतीला कसे सामोरे जावे, येणाऱ्या अडचणींवर मार्ग कसा काढावा, या बरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्न, शंका यांचे यावेळी निरसन केले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने हे मार्गदर्शन सत्र
फेसबुकलाईव्हद्वारे https://www.facebook.com/ Collector-Office-Sindhudurg-101061044850492ऑनलाईन होत आहे.यापूर्वी युपीएससी आणि एमपीएससी विषयी विविध मान्यवरांची मार्गदर्शन सत्र संपन्न झाली आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.