भाजपा दिंव्यांग विकास आघाडी – सिंधुदुर्ग च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच आम.बच्चु कडु यांनी दिंव्यांगांसाठी स्वतंत्र दिंव्यांग कल्याण विभाग निर्माण करणार असल्याचे घोषित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले . तसेच शिंदे – फडणवीस सरकार हे दिंव्यांगांच्या भावनांचा आदर करणारे सरकार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे दिंव्यांग विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी केले
दिंव्यांगाप्रती शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी व आभार व्यक्त करण्यासाठी भाजपा दिंव्यांग विकास आघाडीची जिल्हा पदाधिकारी बैठक कसाल येथे आयोजित करण्यात आली होती . यावेळी जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे यांनी शिंदे – फडणवीस सरकारने गाव – खेड्यातील दिंव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये दिंव्यांग भवन तथा जिल्हा दिंव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार असल्याचे सांगितले . तसेच दिंव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम ही कमी असुन , ती मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणारया शिष्यवृत्ती इतकी देण्यात येणार असल्याचे सांगितले . तसेच अकोला व ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर घरोघरी जाऊन दिंव्यांगांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याचे सांगितले . तसेच खासगी क्षेत्रामध्ये दिंव्यांगांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी सरकारने समीती नियुक्त केल्याचे सांगितले.
यावेळी दिंव्यांग आघाडीचे जिल्हा सरचिटणीस शामसुंदर लोट , स्वाती राऊळ , दिक्षा तेली , चव्हाण मॅडम , सुनील तांबे , प्रकाश वाघ , प्रकाश सावंत , प्रशांत कदम , विठ्ठल शिंगाडे , निलम राणे , मठकर इत्यादी उपस्थित होते .