वार्षिक सवलत कार्ड योजना सुरु करा…..

महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेची मागणी….

कुडाळ:

कोरोना महामारी मुळे आर्थिक संकटात आलेली एस.टी. व एस.टी. कामगार अत्यंत अडचणीत आले असतांना ऊत्पन्नवाढीचे पर्याय एस.टी.ला शोधणे गरजेचे आहे. एस.टी.कडून पुर्वी वार्षिक सवलत कार्ड हि प्रवाशांच्या पसंतीस पडलेली सवलत योजना होती ती बंद पडलेली आहे. ती पुन्हा सुरु करण्यात यावी. या सवलत योजनेत वार्षिक २०० रुपये भरुन कार्ड मिळत असे त्यावर प्रवाशांना प्रवासभाड्यात १०% एवढी सुट मिळत असुन १ लाख५० हजाराचा विमा लागु होत होता ही योजना सुरु करुन सवतत कार्डाचे वार्षिक मुल्य ५०० रुपये करुन योजना कार्यान्वित केल्यास एस.टी. व प्रवाशी या दोन्हींचा फायदा या योजनेतुन होईल. या करीता दिवाळीपुर्वी हि योजना सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेने केली असुन ऊत्पन्नवाढीचा व प्रवाशी वाढीचा मार्ग सुचवला आहे.

सदर योजना लागु करण्यासाठी म.न.रा.प.का.सेना सर्वोतोपरी सहाय्य करेल असे सांगत वार्षिक सवलत कार्ड योजना सुरु करा अशी आग्रही मागणी केली असल्याचे म.न.रा.प.का. सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरी माळी व म.न.रा.प.का. सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी दिली आहे.
सदर योजना सुरु झाल्यास संपुर्ण राज्यभरात आपण सहकार्य करणार असल्याचे मत मनसे नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा