*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखीत अप्रतिम काव्यरचना*
*खिडकी माझी !अन् मी !*
प्रवास तर कधी ना कधी
होता जरी संपणार
तरीही मी खिडकी जवळची
जागा पकडायचो ….
आयुष्याच्या संध्याकाळी खरतरं
खिडकीच्या आत अंधार नसतोच
तरी ही मी चष्मा लावून
एक्सपायरी डेट वाचायचो……!!
काही बोललं नाही तरी चालेल
पण मनातले शब्द ऐकू आले पाहिजे
डोळे पाजळून व्यक्त झालेली माझी
अबीरबुक्याची माया खिडकीतून बाहेर पडली पाहिजे …!!
ह्दयाच्या खिडकीतून सर्व ह्दयांची मी
मनापासून काळजी घेतो
त्या बदल्यात ह्दयही माझी काळजी घेत
खिडकीतूनच मी मायेचं आभाळ
ओढून पांघरून घेतो ….!!
त्या बदल्यात!खिडकी बाहेरच जग
माझा भूतकाळ चघळून घेत..!!
मनसोक्त हसणारी माझी खिडकी
हल्ली गालातल्या गालात हसून घेते
तिला दिलखुलास हसायचं असत पण
खिडकीबाहेर कुणी ऐकेल याची ती
काळजी घेते…
बालपणीचं हास्य खिडकीनं माझ जपलं
वेड्या आईची वेडी माया ती माझ्यावर
आजही करते!
घुसमट आहे!आर्जव आहे!कल्लोळ
ठेच लागली!श्वास मिटला की खिडकी बंद होते!दीर्घ खेळीत! काळजात एक दिलासा जपते….!!!
मी नाही खिडकी मला जपते…..!!!!
माझ्याकरता स्वतःला कोंडून घेते.!!!
बाबा ठाकूर