You are currently viewing पतंग

पतंग

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य…लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम बालकविता.*

 

*वृत्त अनलज्वाला*

         *पतंग*

 

भिंतीवरच्या खुंटीला का तुला टांगले

माझ्यासंगे बोल, सांग मी कुठे भांडले

 

रंगबिरंगी कागदात मी तुला नटवले

अंगावरती मऊ मऊ जणू कपडे चढले

 

पाठीवरच्या ताठ कण्याचा साथी काडी

मजबूत तुझी पाठ पळव तू तेजित गाडी

 

शेपूट तुझी लांब लांब ती सुंदर दिसते

वाऱ्यासंगे मस्ती करुनी हसत खेळते

 

मोठा मांजा बांधून तुला उंच उडवते

कित्ती कित्ती सांगू तेव्हा मज्जा घेते

 

उंच उंच तू उडतो दोरी माझ्या हाती

दूर कितीही गेलास तरी जपली नाती

 

तूच म्हणाला होतास मला ठेव उराशी

कापला जरी गेलो येइन तुझ्या पाशी

 

©【दीपी】

दीपक पटेकर, सावंतवाडी

८४४६७४३१९६

This Post Has One Comment

  1. Hemant Kulkarni

    बालमानस उलगडणारी कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा